विषमुक्त (Residue Free) कांदा पीक लागवड तंत्रज्ञान

  • ✅  हंगाम निहाय शिफारस केलेल्या वाणाची लागवड करावी
  • ✅  कांदा बियाणे कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांचे कडून दर ३ वर्षांनी विकत घ्यावे त्यानंतर स्वतःचे बियाणे स्वतःच तयार करावे
  • ✅  पावसाळी कांदा हलक्या ते मध्यम व उत्तम निचऱ्याच्या जमिनीत घ्यावा
  • ✅  कांद्याची रोपवाटिका बेडवर तयार करावी
  • ✅  बीज प्रक्रिया, रोपप्रक्रिया करावी
  • ✅  लागवडीसाठी योग्य ते अंतर ठेवून एकरी रोपांची संख्या योग्य ठेवावी
  • ✅  एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये गंधक, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची मात्रा द्यावी
  • ✅  पिक ६० दिवसाचे झाले नंतर कोणतेही रासायनिक खत विकास देऊ नये
  • ✅  ठिबक, सूक्ष्म तुषार पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे
  • ✅  नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा
  • ✅  एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाचे विविध उपाय योजावेत
  • ✅  जैविक बुरशीनाशकांची (ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, मेटारायझम, पॅसिलोमायसिस) यांची आळवणी घ्यावी
  • ✅  लेक्यानीसिलियम, बॅसिलस सबटिलीस, नोमुरिया रिल‌ई ई
  • ✅  जैविक कीडनाशकांची फवारणी घ्यावी
  • ✅  कीड व रोगांचे सर्वेक्षण नियमित करावे व आवश्यकतेनुसार रासायनिक कीडनाशकांचा शिफारशीतील मात्रेत आलटून-पालटून फवारण्या घ्याव्यात
  • ✅  फवारणी करताना द्रावणात स्टिकर मिसळावे
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter