विषमुक्त (Residue Free) बाजरी उत्पादन तंत्रज्ञान
✅ मध्यम, निचऱ्याचे जमिनीत पेरणी करावी
✅ संकरित व रोगप्रतिकारक क्षम वाणाची निवड करावी व 15 जुलै पूर्वी पेरणी पूर्ण करावी
✅ एकरी दीड किलोपर्यंत बियाणे, बिज प्रक्रिया (ॲझो, पीएमबी केएमबी व ट्रायकोडर्मा) करून पेरणी करावी
✅ बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे भारी जमिनीत 45X15 व मध्यम जमिनीत 30X15 सेमी अंतरावर पेरणी करावी
✅ एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन अंतर्गत 2 बॅग संयुक्त खत पेरणीचे वेळेस नंतर 25 किलो युरिया 1 महिन्याच्या अंतराने वापरावे
✅ झिंक सल्फेट एकरी 10 किलो व स्फुरद ची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट मधून 3 बॅग पेरणीपूर्वी द्यावे
✅ उगवणपूर्व तणनाशकाची पेरणी झाले बरोबर फवारणी करावी त्यासाठी ॲट्राझिन नंतर 25 दिवसांनी 1 कोळपणी यामुळे उत्तम तणनियंत्रण होते
✅ फुटवे फुटताना, पीक पोटरीत व दाणे भरताना या पीक अवस्थेत पाणी कमी पडू देऊ नका
✅ वनस्पतीजन्य कीडनाशके व जैविक औषधी (लेक्यानीसिलियम, नोमुरिया, बिव्हेरिया, बॅसिलस) ई चा वापर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत करावा
✅ किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास शिफारशीतील मात्रा घेऊन फवारणी करावी
✅ बाजरी : तूर, बाजरी : मटकी, बाजरी : हुलगा इत्यादी आंतरपिक पद्धतीने पेरणी करावी