विषमुक्त (Residue Free) सूर्यफूल उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  मध्यम ते भारी निचऱ्याच्या जमिनीत सूर्यफुलाची पेरणी करावी
  • ✅  संकरित वाणाचे दीड ते 2 किलो बियाणे टोकन करून लागवड करावी किंवा खरीप मध्ये रुंद वरंबा सरी (BBF) पेरणी यंत्राने भारी जमिनीत 60X30, व मध्यम जमिनीत 45X30 पेरणी करावी
  • ✅  एकरी रोपांची संख्या योग्य ठेवा त्यासाठी विरळणी व गॅप भरा
  • ✅  शक्य झाल्यास 20 दिवसांनी पहिली व 30-35 दिवसांनी दुसरी पिकाची कोळपणी करून मातीची भर द्यावी
  • ✅  उगवणपूर्व तणनाशकांचा वापर करा
  • ✅  अमोनियम सल्फेट 1 बॅग व सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग व 1 बॅग पोटॅश ही खते पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून नंतर 30 दिवसांनी युरिया अर्धी बॅग एकरी द्यावी
  • ✅  रोपावस्था, कळी भरणे, फुल उमलणे आणि दाणे भरणे या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण बसू देऊ नका
  • ✅  परागीकरणासाठी एकरी 2 मधमाशा पेट्या ठेवाव्यात किंवा हस्तपरगीकरण करावे
  • ✅  परागीकरण मधमाशामार्फत होते त्यामुळे रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा
  • ✅  जैविक कीडनाशकांचा लेक्यानीसिलियम, बॅसिलस, नोमुरिया, निंबोळी अर्काचा वापर प्रतिबंधात्मक म्हणून करावा
  • ✅  किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास रासायनिक कीडनाशकाची शिफारशीतील मात्रा घेऊन फवारणी करावी
  • ✅  शक्यतो सामूहिक किंवा गटांतर्गत सूर्यफूलाची लागवड करा व स्वतःचा सूर्यफूल तेल घाणा उद्योग उभारून तेलाची व पेंडीची विक्री करावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter