विषमुक्त (Residue Free) मका उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  मध्यम ते भारी काळ्या कसदार परंतु उत्तम निचऱ्याच्या जमिनीत लागवड करावी
  • ✅  वेळेवर पेरणी करावी खरीपसाठी 15 जुलै, रब्बीसाठी 15 नोव्हेंबर व उन्हाळी मका लागवड15 जानेवारी पूर्वी करावी
  • ✅  बाजारात मागणी असणारा वाण लागवडीसाठी वापरावा
  • ✅  वाणाची निवड ही आपण करणार असलेल्या पीक व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापनानुसार करावी
  • ✅  एकरी 6-8 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे
  • ✅  पेरणी किंवा टोकन मध्यम जमिनीत 40X20 सेमी व भारी जमिनीत 60X20 सेमी अंतरावर करावी
  • ✅  जैविक खताची (ॲझेटोबॅक्‍टर, पीएसबी, केएमबी) बीजप्रक्रिया करावी
  • ✅  एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे त्यामध्ये शेणखत, संयुक्त खतामधून नत्र स्फुरद पालाश व झिंक सल्फेट पिकास द्यावे
  • ✅  पीक वाढीचे अवस्थेनुसार पाण्यात विरघळणारी खते फवारावीत
  • ✅  रोप अवस्था, तुरा बाहेर पडताना, फुलोऱ्यात व दाणे भरताना पिकास पाण्याचा ताण बसू देऊ नये
  • ✅  एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे त्यामध्ये सुरुवातीचे पीक वाढीचे अवस्थेत वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करावा लष्करी अळीसाठी बिव्हेरिया,मेटारायझम, नोमुरिया, लेक्यानिसिलियम यांची फवारणी घ्यावी
  • ✅  किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास शिफारस असलेले कीटकनाशक योग्य त्या मात्रेत घेऊन पोंग्यात फवारावे
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter