विषमुक्त (Residue Free) भेंडी उत्पादन तंत्रज्ञान
✅ पावसाळ्यात हलक्या ते मध्यम निचऱ्याच्या जमिनीत लागवड करावी
✅ लागवडीचे अंतर 60 ते 90 X 45 सेमी ठेवावे
✅ पाण्याची सोय असेल तर 15 मे च्या दरम्यान लागवड करावी
✅ राधिका, सिंघम हे वाण लावावेत
✅ बेसल डोस भरून बेडवर लागवड करावी
✅ ट्रायकोडर्मा,पीएसबी,के एम बी, मेटारायझम ची आळवणी लागवडीनंतर लगेच करावी
✅ प्रतिबंधात्मक उपाय योजना जसे की पाच टक्के निंबोळी अर्क, लेक्यानीसिलियम लेक्यानी, बॅसिलस
सब टिलीस, नुमोरिया रिलई या जैविक कीडनाशकांच्या एकत्रित फवारण्या घ्याव्यात
✅ शिफारशीप्रमाणे नत्रयुक्त खताचा वापर करावा
✅ कीड रोगाचे नियमित सर्वेक्षण करून सकाळी / सायंकाळी फवारण्या घ्याव्यात
✅ एकात्मिक कीड / रोग व्यवस्थापन करावे
✅ शिफारस असलेलेच कीडनाशकांचा वापर करावा