विषमुक्त (Residue Free) अंजीर उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  दमट, जास्त आर्द्रता युक्त व जास्त पावसाच्या प्रदेशात अंजिराची लागवड करू नका
  • ✅  हलक्या ते मध्यम चुनखडीयुक्त, तांबूस निचऱ्याच्या काळ्या जमिनीत लागवड करावी
  • ✅  फुले राजेवाडी याच वाणाची लागवड करावी
  • ✅  झाडाची 3-4 खोड ठेवून त्यावरिल फांद्याची नियमित छाटणी करून आकार द्यावा
  • ✅  शेणखताचे भरपूर प्रमाणासह एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे
  • ✅  ठिबकचे 2 लॅटरल, 1 फूटावर ड्रिपर, दोन ड्रिपरमध्ये 1 ते दीड फूट अंतर असे ठिबक बसवा
  • ✅  खोडास पाणी लागू देऊ नका, माती लावू नका
  • ✅  नियमित जैविक खते (ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी, केएमबी) व जैविक बुरशी (ट्रायकोडर्मा,पॅसिलोमायसिस, मेटारायझम, ॲनिसोप्ली) चे आळवण्या करा
  • ✅  फवारणीसाठी जैविक किडनाशके जसे की (लेक्यानी सिलियम लेक्यानी, लॅक्टोबॅसिलस, नोमुरिया रिलई, बॅसिलस सबटिलीस ची फवारणी करावी
  • ✅  एकात्मिक अन्‍नद्रव्य व्यवस्थापन करावे
  • ✅  एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter