विषमुक्त (Residue Free) शेवगा उत्पादन तंत्रज्ञान
✅ हलक्या ते मध्यम जमिनीत लागवड करा
✅ पीकेएम -2, ओडिसी – 2 या पैकी एक वाण लावा
✅ भारी जमिनीत लागवड 14 X 8, मध्यम जमिनीत 12 X 7 व हलक्या जमिनीत 10 X 5 अंतरावर करा
✅ बिया टोकण करून लागवड करा, रोप लावू नका
✅ ठिबक चे 2 लॅटरल सिंचनासाठी पाण्यासाठी वापरा
✅ पावसाळ्यात शेतात पाणी साचनार नाही याची दक्षता घ्या
✅ दर 4 महिण्याला एकात्मिक खत व्यवस्थापन करा
✅ ठिबकच्या लॅटरलवर झेडू चे आंतर पिकाची लागवड करावी
✅ छाटणीचे प्रकार समजून घ्या, माहिती घ्या, छाटणी स्वत: करा
✅ एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे
✅ एकात्मिक कीड व रोग व्यवस्थपन अंतर्गत शिफारस असलेली कीडनाशकांचा वापर करावा
✅ कीड व रोगांसाठी नियमित पीक पाहणी करावी व प्रतिबंधात्मक निंबोळी अर्क, लेक्यानीसिलियम, नोमुरिया, बॅसिलस यांचा वापर करावा
✅ किडनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास शिफारस असलेली कीडनाशके योग्य त्या मात्रेत घेऊन फवारणी करावी