विषमुक्त (Residue free) कलिंगड लागवड तंत्रज्ञान

  • ✅  वाणाची निवड करताना कोणत्या बाजारपेठेत माल विक्री करणार आहोत याची माहिती घ्यावी
  • ✅  ज्यूस साठी स्थान‍िक मागणी असलेली वाण वेगळे आहेत, दूरच्याबाजारपेठेत पाठवण्याचे , लांबचे वाहतूकीसाठीचे वाण वेगळे आहेतत्याची माहिती घ्यावी
  • ✅  लागवडीचा कालावधी ठरवताना आपलेकडील हवामान, या फळाची बाजारातील मागणी याचा विचार करावा
  • ✅  दूरचे वाहतूकीसाठी वाणाची टिकवणक्षमता महत्वाची असते त्यासाठी बाजारपेठेत पोहचेपर्यंत मालाची टिकवण क्षमता टिकणे आवश्यक असते
  • ✅  त्यानुसार वाण व बाजारपेठेची माहिती घ्यावी
  • ✅  आगाप लागवडीसाठी म्हणजे नोव्हेंबर – डिसेंबर लागवडीसाठी निवडलेल्यावाणीची साली ची जाडी कमी असलेले, वेलीची कॅनोपी कमी असलेले वाण निवडावेत कारण हे वाण तसेही उन्हाळ्याचे सुरूवातीस बाजारात जात असतात त्याची टिकवणक्षमता चांगली असते, वाहतूकीसाठी चांगले असतात
  • ✅  या हंगामात जास्त साल जाड असलेली कॅनोपी, जास्त असलेले वाण निवडले तर प‍िक तयार होण्यास जास्त कालावधी लागतो
  • ✅  प‍िक काढणीस तयार झाले की नाही याबाबत माहिती करून घ्यावी
  • ✅  हे प‍िक एकाचचवेळी तोडणीस तयार होत नाही
  • ✅  याची काढणी 2-3 टप्यात करावीलागते
  • ✅  या पिकांच्या लागवडी एकत्र‍ित गट, ग्रुप करून करावी त्यामुळे नियमितपणे बाजारपेठेत माल पाठवता येतो त्याचवेळेस गटातील शेतकऱ्यांची एकमेकास प‍िक उत्पादन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करता येते
  • ✅  आगाप लागवडीसाठी शेताची वाफश्यावर मशागत करावी, ओल्या / आंबट ओल्या जमिनीत मशागत करू नका
  • ✅  जमिनीस विश्रांती दिलेल्या ठिकाणी लागवड करावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter