डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान
✅ हलकी, मध्यम व निच·याच्या जमिनीची निवड करावी
✅ एक फूट खोल खोलवरिल मातीचा नमूना काढून त्याची तपासणी करून घ्या मुक्त चुन्याचे प्रमाण 8 पेक्षा कमी असावे
✅ शिफारशीतील अंतरावर लागवड ती पण खड्डे खोदून करावी
✅ लागवड गुटी कलमाद्वारे तयार केलेल्या रोपांपासून करावी उती संवर्धित नाही
✅ लागवडीपूर्वी रोपांवर प्रक्रिया करा
✅ ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस, स्फुरद विरघळणारे जिवाणू, पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू, अस्परजिलस ई
✅ वापर आळवणीसाठी करावा त्यामूळे जमिनीतून होणाऱ्या रोगांचा प्रार्दूभाव होत नाही
✅ पावसाळी वातावरणात, रिमझिम पाऊस असताना लागवड करावी
✅ दोन इन लाईन लॅटरल, प्रत्येक फूटावर एक ते दोन लिटर प्रति तास डिस्चार्ज चे ड्रिपर बसवा, लॅटरल झाडाचे घेराचे बाहेर, उन्हात ठेवावी
✅ झाडाचे वाढीनुसार ठिबकचे नळ्या बाहेर घेत राहावे
✅ पाणी आठवड्यातून दोन वेळा वाफसा आल्यानंतरच द्या
✅ लागवडीनंतर झाडास 4 महिने चांगली वाढू द्या
✅ झाडास वळण देणे अत्यंत आवश्यक, झाडाचे वय दिड ते दोन वर्ष झाल्यानंतर बहार धरावा
✅ झाडाचे वाढीनुसार ठिबकचे नळ्या बाहेर घेत राहावे
✅ फळ वाढीच्या टप्यानुसार, एकात्मिक खत व्यवस्थापन करा
✅ सेंद्रिय खते, निंबोळी पेंडीचा वापर करावा
✅ पिक फुलोऱ्यात असताना रासायनिक किडनाशकांचा वापर टाळा
✅ स्पर्शजन्य व आंतरप्रवाही किडनाशके, दरवेळेस वेगळ्या गटातील किडनाशके आलटून पालटून वापरावीत
✅ झाडाच्या वयानुसार फळांची संख्या मर्यादित ठेवा, शेंड्याकडील, किडींनी चाटलेली फळे काढून टाकावीत
✅ वर्षातून एकच बहार घ्यावा, दोन नाही