विषमुक्त ( Residue Free ) बटाटा लागवड तंत्रज्ञान
✅ हंगामनिहाय शिफारस केलेल्या वाणाची लागवड करावी
✅ बियाणे हे खात्रीचे पुरवठा दाराकडून खरेदी करावे
✅ बीज प्रक्रिया (ट्रायकोडर्मा ॲझेटो, पीएसबी, केएमबी) करूनच लागवड करावी
✅ बेडवर लागवड करावी
✅ एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे
✅ ठिबक, सूक्ष्म तुषार चा पाणी व्यवस्थापनासाठी वापर करावा
✅ जैविक कीडनाशके (मेटारायझम, पॅसिलोमायसिस, ट्रायकोडर्मा, सुडो मोनास फ्लूरोसन्स) च्या आळवण्या घ्याव्यात
✅ वनस्पतीजन्य कीडनाशके 5% निंबोळी अर्काची फवारणी व जैविक कीडनाशके जसे की बॅसिलस, लेक्यानीसिलियम, नोमुरिया रिलई ई ची फवारणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करावी
✅ कीड व रोगाचे नियमित सर्वेक्षण करून एकात्मिक व्यवस्थापन करावे
✅ शिफारस असलेली किडनाशकांची फवारणी आलटून पालटून योग्य त्या मात्रेतच घ्यावी