विषमुक्त (Residue Free) काकडी उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  हलक्या ते मध्यम जमिनीत पावसाळ्यात व भारी खोल काळ्या जमिनीत लेट रब्बीव उन्हाळी लागवड करावी
  • ✅  शिफारशी प्रमाणे बेसल डोस द्यावा
  • ✅  आपण उत्पादित केलेला माल कोणत्या बाजारपेठेत पाठवणार आहोत यानुसारवाणाची निवड करावी
  • ✅  5-6 फुटाचे बेड व 1
  • ✅  5-2 फुटावर झिगझॅग लागवड करावी
  • ✅  तार काठी / स्टेजिंग नेट वर काकडी बांधावी / सोडावी
  • ✅  पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर बाजारभाव व पिकाची गरज यानुसार करावा
  • ✅  आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे
  • ✅  जैविक कीडनाशके (ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, मेटारायझम, पॅसिलोमायसिस) च्याआळवण्या जमिनीमध्ये 2/3 वेळा कराव्यात
  • ✅  प्रतिबंधात्मक म्हणून जैविक कीडनाशकांचे लेक्यानिसिलियम,  बॅसिलससबटिलीस, नोमुरिया रिल‌ई, लॅक्टोबॅसिलस ची 10-15 दिवसाचे अंतराने फवारण्या घ्याव्यात
  • ✅  लिंबोळी अर्क 5% च्या फवारण्या घ्याव्यात
  • ✅  नियमित पिकाचे सर्वेक्षण करून किडींनी नुकसानीची पातळी ओलांडल्यास व रोगांना अनुकूल वातावरण असल्यास शिफारशीतील कीडनाशके शिफारस केलेल्या प्रमाणात घेऊनसकाळी / सायंकाळी फवारावीत
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter