विषमुक्त (Residue Free) सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवडा
  • ✅  मध्यम जमिनीत - जे एस 335, 9365, 9560 भारी जमिनीत - MAUS -612, फुले संगम, फुले किमया, फुले दूर्वा
  • ✅  हलक्या जमिनीत सोयाबीन पेरू नका
  • ✅  रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पेरणी यंत्राद्वारेच 45X15 हलक्या / मध्यम जमिनीत व 60X15 भारी जमिनीत सोयाबीन पेरावे
  • ✅  घरच्या सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता तपासावी
  • ✅  बिजप्रक्रिया-रासायनिक व ट्रायकोडर्मा, पीएसबी, रायझो व केएमबी करावी
  • ✅  एकरी 20 किलो पेरणीसाठी तर टोकणसाठी 16 किलो बियाणे वापरा
  • ✅  उगवणपूर्व तणनाशक-पेंडीमिथिलिन व नंतर 20-35 दिवसांनी 2 कोळपणी करा अथवा उगवणपश्चात तणनाशके तणे 2-3 पानावर असताना फवारून तण नियंत्रण करावे
  • ✅  खोडअळी व चक्रीभुंगाचे प्रादुर्भाव ओळखण्यासाठी रोपे उलटून तपासणी करा व नियंत्रणाचे उपाय करा
  • ✅  पावसाचा खंड पडल्यास संरक्षित पाणी द्या
  • ✅  एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, भारी आम्लयुक्त जमिनीत सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग पेरणीपूर्वी द्यावे
  • ✅  डीएपी सोबत सल्फर 4 किलो एकरी द्यावा
  • ✅  पीक वाढीच्या अवस्थेनुसार पाण्यात विरघळणारी खते फवारणी सोबत घ्यावीत
  • ✅  कीड व रोगांसाठी नियमित पीक पाहणी करावी व प्रतिबंधात्मक निंबोळी अर्क, लेक्यानीसिलियम, नोमुरिया, बॅसिलस यांचा वापर करावा
  • ✅  किडनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास शिफारस असलेली कीडनाशके योग्य त्या मात्रेत घेऊन फवारणी करावी
  • ✅  फवारणीसाठी कोणतेही टॉनिक, आळवण्यासाठी ह्युमिक वापरू नका त्याची काही गरज नसते
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter