मटकी व हुलगा (कुळीथ) पिकाची विषमुक्त (Residue Free) लागवड पद्धती
✅ भरपूर मागणी व चांगला बाजार भाव असलेली पिके
✅ उत्पादन खर्च अत्यंत कमी
✅ कमी कष्टात, पावसाच्या पाण्यावर व आरोग्यास अत्यंत पोषक अशी दुर्लक्षित पिके
✅ एकरी 3-4 क्विंटल उत्पादन सहज येते सोयाबीन सारखे व्यवस्थापन केल्यास जास्त उत्पादन मिळू शकते
✅ वेळेत पेरणी करा - 15 जुलै पूर्वी
✅ सुधारित वाणाचा वापर करा
✅ पेरणीपूर्वी जैविक खतांची ( रायझोबियम, पीएसबी, केएमबी व ट्रायकोडर्माची) बीज प्रक्रिया करा
✅ 30X10 सेमी अंतरावर बीबीएफ पेरणी यंत्राने पेरणी करावी
✅ पेरणी करताना सोबत रासायनिक खत बिया खाली पडेल अशी पेरणी करावी
✅ खताची कमी आवश्यकता, कीड रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे उत्पादन खर्च अत्यंत कमी होतो
✅ उत्पादन कमी मिळाले तरी उत्पन्न मात्र चांगले मिळते
✅ उत्पादित मालाची स्वतः विक्री करा