विषमुक्त (Residue Free) तूर पिक लागवड पद्धती
✅ सोयाबीन : तूर आंतरपीक घ्यावे किंवा निव्वळ तूर पिकाची लागवड करावी
✅ उत्तम निचऱ्याची मध्यम ते भारी निचऱ्याच्या जमिनीत पेरणी करावी
✅ निव्वळ तुरीची शक्यतो टोकन करावी तर सोयाबीन सोबत आंतरपीक घ्यावयाचे असेल तर बीबीएफ पेरणी यंत्राने पेरणी करावी
✅ मध्यम जमिनीत बीडीएन -711, भारी जमिनीत बीडीएन 2013-14,(गोदावरी), बीडीएन-716 या वाणाची पेरणी करावी
✅ बीजप्रक्रिया करून (रायझोबियम, ट्रायकोडर्मा, पीएसबी व केएमबी) लागवड करावी
✅ यामुळे 15% उत्पादनात वाढ होते
✅ पेरणीनंतर 25 व्या व 50 व्या दिवशी तुरीचे शेंडे खुडावेत
✅ एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनास तुर पिक चांगला प्रतिसाद देते
✅ आंतरपिका मधील सोयाबीनची काढणी केल्यावर हलकी मशागत करून रासायनिक खताचा डोस द्यावा
✅ पिक फुलोरा अवस्था, शेंगा भरताना पाणी व्यवस्थापन करावे
✅ पिकास ताण पडण्यापूर्वी व फुलोऱ्यापूर्वी पिकास पाणी द्यावे
✅ एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे त्यासाठी फुले निघाल्यास सुरुवात होताच पहिली फवारणी व त्यानंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी
✅ शिफारस असलेल्या रासायनिक कीडनाशकांची फवारणी योग्य ते मात्रेतच सकाळी / सायंकाळी मिसळून फवारणी घ्यावी व त्यासोबत पाण्यात विरघळणारी खताची फवारणी घ्यावी
✅ अनावश्यक टॉनिक, व ह्युमिक चा वापर टाळावा