ज्ञानाच्या शेतीच्या माध्यमातून आपण विविध कृषी संशोधन संस्था व प्रगतशील शेतकरी यांनी विकसित केलेले पिकांचे उच्च तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मशागतीवरील खर्च कमी करणे , किड व रोग नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकांचा वापर करणे, लेबल क्लेम नुसार रसायनांचा वापर करणे , अनावश्यक रसायानांचा वापर कमी करणे ,
जमिनीचे आरोग्य सुधारणे आणि शाश्वत आणि निरंतरपणे कृषी उत्पादन घेणे या विषयावर काम केले जात आहे
ज्ञानाच्या शेतीच्या माध्यमातून ज्ञान व कौशल्य आधारित शेती चे प्रारूप (Model) विकसित केले आहेत . या मॉडेलचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादनात वाढ करणे, शेती किफायतशीर करणे तसेच विषमुक्त (Residue Free) आरोग्यदायी अन्न तयार करणे ही उद्दिष्ट्ये साध्य होतील.
आपल्या पिकासाठी आज अखेर सिध्द झालेले तंत्रज्ञानाबाबत माहिती
शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठ्या निविष्ठा वरील खर्च कमी करणे
उच्च तंत्रज्ञान वापरत असताना उत्पादन खर्च कमी करून उत्पादके मध्ये वाढ करणे
शेतीमधील रसायनाचा वापर शास्त्रोक्त पद्धतीने करणे