विषमुक्त (Residue Free) टोमॅटो उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  पावसाळी लागवड मध्यम निचऱ्याच्या पण सेंद्रिय कर्ब चांगला असलेल्या जमिनीत करावी
  • ✅  बाजारात मागणी, ग्राहकास पंसतीस असणारा वाण निवडावा
  • ✅  रोपवाटिकेत रोपांची आगाऊ नोंदणी करावी
  • ✅  बेसल डोस मजबूत द्यावा
  • ✅  त्यामध्ये शेणखत (5-10 टन), लिंबोळी पेंड, रासायनिक खत, सूक्ष्म अन्नद्रव्य, सिंगल सुपर फॉस्फेट इत्यादी चांगले मिसळून 5 फूट अंतरावर बेड करावेत
  • ✅  लागवडीनंतर जैविक खते व कीडनाशकांच्या (ट्रायकोडर्मा, सुडोमोनास फ्लूरोसन्स, , मेटारायझम, पॅसिलोमायसिस) आळवण्या करा
  • ✅  मल्चिंग पेपर वर लागवड करावी
  • ✅  लागवड सायंकाळी करावी
  • ✅  रासायनिक खताच्या कीडनाशकांच्या आळवण्या करू नका
  • ✅  पाणी गरजेपुरतेच द्या, रोज पाणी द्या पण कमी मात्रेत द्यावे
  • ✅  30-35 दिवसात वेलीला आधार द्या
  • ✅  अनावश्यक टॉनिक, ह्युमिक, पाण्यात विरघळणारी खते ठिबक मधून सोडू नका
  • ✅  झाडावर जैविक, अजैविक ताण येणार नाही याकडे लक्ष द्या
  • ✅  पिकाची नियमित पाहणी करा, वातावरण बदलावर लक्ष ठेवा
  • ✅  प्रतिबंधात्मक उपाय योजना मध्ये जैविक कीडनाशके (लेक्यानीसिलियम, बॅसिलस, नोमुरिया, बिव्हेरिया) व लिंबोळी अर्काची फवारणी घ्या
  • ✅  किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास शिफारस असलेल्या रासायनिक कीडनाशकांची शिफारशी प्रमाणे मात्रा घेऊन फवारणी करावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter