विषमुक्त ( Residue Free ) बटाटा लागवड तंत्रज्ञान
✅ पिकाची फेरपालट करावी
जमिनीत चांगली मशागत करून योग्य 3-4 फूट अंतरावर बेड तयार करावेत
✅ एका बेडवर दोन ओळीत लागवड करा त्यासाठी एक इनलाईन लॅटरल अंथरूण घ्या
हंगामनिहाय शिफारस केलेल्या वाणाची लागवड करावी
✅ बियाणे खात्रीचे पुरवठादाराकडून आवश्यक त्या वाणाचे खरेदी करावे
✅ बीज प्रक्रिया (ट्रायकोडर्मा ॲझेटो, पीएसबी, केएमबी) करून लागवड करावी
✅ एका बेडवर दोन ओळीत लागवड करा त्यासाठी एक इनलाईन लॅटरल अंथरूण घ्या
✅ 30 × 15 सेंटीमीटर अंतरावर बेडवर पोटॅटो प्लांटरने लागवड करावी
✅ एकरी 8-10 टन व 40: 25 :25 नत्र,स्फुरद,पालाश चा वापर करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे
✅ ठिबक, सूक्ष्म तुषार सिंचनचा पाणी व्यवस्थापनासाठी वापर करावा
✅ जैविक कीडनाशके (मेटारायझम, पॅसिलोमायसिस, ट्रायकोडर्मा, सुडो मोनास फ्लूरोसन्स) च्या आळवण्या घ्याव्यात
✅ वनस्पतीजन्य कीडनाशके 5% निंबोळी अर्काची फवारणी व जैविक कीडनाशके जसे की बॅसिलस, लेक्यानीसिलियम, नोमुरिया रिलई, ची फवारणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करावी
✅ किड व रोगाचे नियमित सर्वेक्षण करून त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे
✅ शिफारस असलेल्या किडनाशकांची शिफारशीतील मात्रेत फवारणी घावी
किडनाशकांचा वापर आलटून पालटून करावा