विषमुक्त ( Residue Free ) बीट लागवड तंत्रज्ञान

  • ✅  लागवडी सोपे,कमी उत्पादन खर्चाचे,कमी कालावधीचे कंदवर्गीय आणी आरोग्यदाई पिक
  • ✅  उच्च तापमान व जास्त थंडीचा कालावधी वगळून वर्षभर लागवड करता येते
  • ✅  पावसाळ्यात हलक्या ते मध्ये व रब्बी आणि उन्हाळी हंगामात मध्यम ते भारी, तांबूस,निचऱ्याच्या काळ्या जमिनीत लागवड करावी
  • ✅  खूप काळ्या खोल जमिनीत बीट लागवड करू नये
  • ✅  जमिनीचा सामू 6-10 म्हणजेच क्षारयुक्त जमिनीत सुद्धा लागवड करता येते बाजारातील मागणीचा विचार करून लागवडीचा हंगाम व वाणाची निवड करावी
  • ✅  पेरणी यंत्राणे खरीपात 45 X 15 सेमी व रब्बी मध्ये लागवड 30 – 45 X 15 सेमी अंतरावर करावी
  • ✅  पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा, स्फुरद विरघळणारे जिवाणू व पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू प्रत्येकी 5 ग्रॅम प्रमाणे बिजप्रक्रिया करावी
  • ✅  रुंद वरंबा सरी म्हणजेच बेडवर पिकाची लागवड करावी
  • ✅  पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक, तुषार किंवा रेन गनचा वापर फायदेशीर होत आढळून आला आहे
  • ✅  लागवडीनंतर एक वेळेस जैविक बुरशीनाकांची (ट्रायकोडर्मा,पॅसिलोमायसिस, मेटारायझम ॲनिसोप्ली, बिव्हेरिया बॅसीयाना) आळवणी करावी
  • ✅  फवारणीसाठी जैविक किडनाशके जसे की (लेक्यानीसिलियम लेक्यानी, लॅक्टोबॅसिलस, नोमुरिया रिलाई, बॅसिलस थुरेंगेनिसिस व बेसिलस सबटिलीस ची फवारणी करावी
  • ✅  एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे
  • ✅  एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे
  • ✅  बाजारभाव कमी असल्यास उत्पादित माल शितगृहात साठवणूक करावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter