विषमुक्त (Residue Free) कोथिंबीर लागवड तंत्रज्ञान
✅ मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात वातावरणात बदल झाल्यावर लागवड करावी
✅ पावसाळ्यातील लागवड हलक्या, उताराच्या, निचऱ्याच्या जमिनीवर करावी
✅ बिजप्रक्रिया (ट्रायकोडर्मा पीएसबी, केएमबी) यांचा वापर करून पेरणी करावी
✅ लागवड ही पेरणी करून करावी, फोकून नव्हे
✅ पीक बेडवरच राहील याची दक्षता घ्यावी
✅ उत्कृष्टपणे नियंत्रणासाठी पेरणी झाल्यावर गोल ची फवारणी करावी
✅ स्प्रिंकलर / रेन पाईपने पाणी व्यवस्थापन करावे
✅ ट्रायकोडर्मा सुडोमोनास फ्लूरोसन्स, पॅसिलो, मेटारायझम या जैविक खतांचा व कीडनाशकांची पावडर 2 किलो प्रति एकर
✅ पाण्याच्या पुढे जमिनीवर विस्कटून द्यावी
✅ 19:19:19 ची फवारणी करावी दर आठवड्याला
✅ एकात्मिक कीड व रोग नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकाची (लेक्यानीसिलियम बिव्हेरिया, नोमुरिया, बॅसिलस सबटीलीस, लॅक्टोबॅझीलम) यांची फवारणी करावी
✅ 5% निंबोळी अर्काची दर दहा दिवसांनी फवारणी करावी
✅ विषमुक्त पालेभाज्या उत्पादनासाठी शिफारस असलेली किडनाशके, शिफारस केलेल्या मात्रेतच फवारावीत