विषमुक्त (Residue Free) मेथी लागवड तंत्रज्ञान

  • ✅  10 अंश सेल्सिअस ते 36 अंश सेल्सिअस तापमान मेथी पिकास मानवते
  • ✅  जास्त पावसापासून पिक वाचवण्यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीवर पिकाची पेरणी करावी
  • ✅  पावसाळ्यात हलक्या ते मध्यम परंतु उत्तम निचऱ्याच्या जमिनीत लागवड करावी
  • ✅  पेरणीसाठी बाजारात मागणी असणाऱ्या गावरान किंवा सुधारित वाणाचा वापर करावा
  • ✅  गावरान वाणांमध्ये हत्ती,डायमंड,डॉलर तसेच सुधारित मध्ये बॉम्बे सुपर, दिपक,अशोका लाल कोर इत्यादी वाण प्रचलित आहेत
  • ✅  पेरणीपूर्वी बियाणास बिजप्रक्रिया (ट्रायकोडर्मा पीएसबी, केएमबी) करावी
  • ✅  लागवड ही पेरणी करून करावी, फोकून नव्हे
  • ✅  उत्कृष्टपणे तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यावर लगेच गोल ची फवारणी करावी
  • ✅  स्प्रिंकलर किंवा रेन पाईपने पाणी व्यवस्थापन करावे
  • ✅  ट्रायकोडर्मा सुडोमोनास फ्लूरोसन्स, पॅसिलो, मेटारायझम या जैविक खतांचा व किडनाशकांची पावडर 1 किलो प्रति एकर पाण्याच्या पुढे जमिनीवर विस्कटून द्यावी
  • ✅  19:19:19 ची फवारणी दर 8-10 दिवसांनी करावी
  • ✅  एकात्मिक कीड व रोग नियंत्रणासाठी जैविक किडनाशकाची (लेक्यानीसिलियम , बिव्हेरिया, नोमुरिया, बॅसिलस सबटीलीस, लॅक्टोबॅसिलस ) यांची फवारणी करावी
  • ✅  5% निंबोळी अर्काची दर 10 दिवसांनी फवारणी करावी
  • ✅  विषमुक्त पालेभाज्या उत्पादनासाठी शिफारस असलेली किडनाशके, शिफारस केलेल्या मात्रेतच फवारावीत
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter