विषमुक्त (Residue Free) दोडका लागवड तंत्रज्ञान
✅ हलक्या ते मध्यम जमिनीत पावसाळ्यात व भारी खोल काळ्या जमिनीत लेट रब्बी व उन्हाळी लागवड करावी
✅ शिफारशी प्रमाणे बेसल डोस द्यावा
✅ आपण उत्पादित केलेला माल कोणत्या बाजारपेठेत पाठवणार आहोत यानुसार वाणाची निवड करावी
✅ 5-6 फुटाचे बेड व 1
✅ 5-2 फुटावर झिगझॅग लागवड करावी
✅ तार काठी / स्टेजिंग नेट वर काकडी बांधावी / सोडावी
✅ पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर बाजारभाव व पिकाची गरज यानुसार करावा
✅ आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे
✅ जैविक कीडनाशके (ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, मेटारायझम, पॅसिलोमायसिस) च्या आळवण्या जमिनीमध्ये 2/3
वेळा कराव्यात
✅ प्रतिबंधात्मक म्हणून जैविक कीडनाशकांचे लेक्यानिसिलियम, बॅसिलस सबटिलीस, नोमुरिया रिलई,
लॅक्टोबॅसिलस ची 10-15 दिवसाचे अंतराने फवारण्या घ्याव्यात
✅ लिंबोळी अर्क 5% च्या फवारण्या घ्याव्यात
✅ नियमित पिकाचे सर्वेक्षण करून किडींनी नुकसानीची पातळी ओलांडल्यास व रोगांना अनुकूल वातावरण
असल्यास शिफारशीतील कीडनाशके शिफारस केलेल्या प्रमाणात घेऊन सकाळी / सायंकाळी फवारावीत