लसूण लागवड करावी का ? आणी त्यासाठीचे सुधारित तंत्रज्ञान कोणते ?
✅ महाराष्ट्रातील वातावरण लसूण लागवडीसाठी तितकेसे चांगले नाही त्यामुळे फार मोठे क्षेत्रावर लसूण लागवड करू नये
✅ आपल्याकडील वाण कमी कालावधीचे आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उत्पादकता कमी मिळते तरीसुद्धा उत्पादकता वाढीसाठी भरपूर वाव आहे
✅ मध्यम ते भारी परंतु निचऱ्याच्या जमिनीत लागवड करावी
✅ लागवड वेळेत करावी
✅ लागवडीसाठी फुले बसवंत, भीमा पर्पल, यमुना सफेद 1 आणी 2 हे वाण लागवडीसाठी वापरावेत
✅ 1 - 1,5 ग्रॅम वजनाच्या निरोगी कुड्या लागवडीसाठी वापराव्यात
✅ लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा, अझोस्पिरिलियम, पीएसबी व केएमबीची बिज प्रक्रिया करावी
✅ लागवड बेडवर करावी, त्यासाठी बेडची रुंदी 4 फूट तर उंची अर्धा फूट असावी
✅ बेडवर इनलाईन लॅटरल अंथरून 15 × 10 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी
✅ बेड तयार करण्यापूर्वी शेणखत 10 टन, 40 : 20 : 20 नत्र, स्फुरद, पालाश व 10 किलो गंधक मातीत मिसळून घ्यावे
✅ पिक वाढीच्या अवस्थेनुसार पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर करावा
✅ तण नियंत्रणासाठी उगवण पूर्व तणनाशक ऑक्सिफ्लोरोफेन किंवा पेंड्यामिथिलिन वापरावे
✅ ठिबक अथवा मायक्रो स्प्रिंकलरवर लसणाची लागवड करावी
✅ जमिनीची प्रत व वातावरणानुसार पाणी नियोजन करावे
✅ फुलकिडे, मावा, तुडतुडे, लाल कोळी या किडीचा तसेच गड्डा कुज,पांढरी कुज, काजळी,तपकिरी करपा,भुरी इत्यादी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन करावे
✅ पिक पक्व झाल्यानंतर पिकाची काढणी करून 2-3 दिवस शेतात वाळवावे व पात आंबट ओली असताना 20 ते 30 लसणाच्या गड्ड्याची वेणी बांधून झाडाखाली किंवा हवेशीर साठवणूक करावी