तार काटीवरील कमी खर्चात, जास्त उत्पन्न देणारी चवळी लागवड तंत्रज्ञान
✅ वर्षातून अति थंडी,अति पाऊस किंवा अति तापमान कालावधी सोडल्यास केव्हाही लागवड करता येते
✅ मध्यम ते भारी परंतु निचऱ्याच्या आणी सेंद्रिय कर्ब चांगला असलेल्या जमिनीत लागवड करावी
✅ बाजारात मागणी असणारा , ग्राहकास पंसतीस असणारा उच्च उत्पादनक्षम वाण लागवाडीसाठी निवडावा
✅ अंकुरची केतकी , धरतीची बबली, मोहदयाची शारदा इत्यादी संकरित वाण बाजारात उपलब्ध आहेत
बेसल डोस मजबूत द्यावा
✅ त्यामध्ये शेणखत (5-10 टन), लिंबोळी पेंड, रासायनिक खत, सूक्ष्म अन्नद्रव्य, सिंगल सुपर फॉस्फेट इत्यादी जमिनीत चांगले मिसळून 5 -6 फूट अंतरावर बेड करावेत
✅ लागवड 5 - 6 X 1,5 - 2 फूट अंतरावर झिगझॅग करावी
✅ लागवडीनंतर जैविक खते व कीडनाशकांच्या (ट्रायकोडर्मा, सुडोमोनास फ्लूरोसन्स, बिव्हेरिया , मेटारायझम, पॅसिलोमायसिस) आळवण्या करा
✅ 50 मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर वापरावा
✅ पाणी गरजेपुरतेच द्या, बेड कायम वाफस्यावर राहू द्या, नियमित परंतु कमी मात्रेत पाणी द्यावे
✅ 25 - 30 तारकाटी करून दिवसात वेलीला आधार द्या
✅ अनावश्यक रासायनिक कीडनाशके , टॉनिक व ह्युमिक ठिबक मधून सोडू नका
✅ झाडावर जैविक, अजैविक ताण येणार नाही याकडे लक्ष द्या
✅ पिकाची नियमित पाहणी करा, वातावरण बदलावर लक्ष ठेवा
✅ प्रतिबंधात्मक उपाय योजना मध्ये जैविक कीडनाशके (लेक्यानीसिलियम, बॅसिलस, नोमुरिया, बिव्हेरिया) व लिंबोळी अर्काची फवारणी घ्या
✅ किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास शिफारस असलेल्या रासायनिक किडनाशकांची शिफारशी प्रमाणे मात्रा घेऊन फवारणी करावी
✅ नियमित तोडे करा, वेगवेगळ्या बाजारात माल पाठवा
उत्पादन खर्च कसा कमी होईल यावर कटाक्षाने लक्ष द्या