उच्च उत्पादनासाठी कमी खर्चातील ब्रोकोली लागवड पद्धत
✅ हे एक परदेशी पालेभाजी पिक असून याचा वापर मुख्यत्वे सॅलड, मिक्स व्हेज, ज्यूस, पराठे, इत्यादी मध्ये मध्ये केला जातो
✅ लागवडपूर्वी पिक विक्रीबाबतची संपूर्ण माहिती घ्या
✅ नियमितपणे अर्धा एकर ते एक एकर क्षेत्रावर लागवड करावी जेणेकरून मागणीप्रमाणे पुरवठा करणे शक्य होईल
✅ रोपे वाढीसाठी 20 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअस तापमान व गड्डा तयार होण्यासाठी 15 - 20 अंश सेल्सिअस तापमान या पिकास मानवते
✅ पावसाळ्यात हलक्या ते मध्यम रेती मिश्रित पोयट्याची परंतु उत्तम निचऱ्याच्या जमिन व रब्बी आणि अर्ली उन्हाळी साठी मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी निवडावी
✅ जास्त पावसापासून पिक वाचवण्यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीवर पिकाची पेरणी करावी
✅ पेरणीसाठी बाजारात मागणी असणाऱ्या संकरित वाणाचा वापर करावा
✅ संकरित वाणांमध्ये सकाटाची : साकी, ग्रीन मॅजिक, सिंजेंटाची : बेस्टी, मोनोपोली, नामधारीची : 1250, क्लाउची: फॅन्टॅसी, बेजो सीड ची लकी इत्यादी वाण लागवडीसाठी बाजारात उपलब्ध आहेत
✅ लागवडीचे वेळी रोपाचे वय 20 ते 25 दिवसाचे असावे व त्यास 5 ते 6 निरोगी पाने असावीत आणी रोपांची उंची 12 ते 15 सेंटीमीटर असावी
✅ सरासरी एकरी 25,000 ते 30,000 रोपे लावली जातात
✅ लागवडीपूर्वी रोपास प्रक्रिया (ट्रायकोडर्मा पीएसबी, केएमबी) करावी
✅ एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे ज्यामध्ये शेणखत, दाणेदार खत,लिंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट,सूक्ष्मलद्रव्य ग्रेड एक किंवा चिलटेड मॉलिब्डेनम व बोरॉन यांचा वापर करावा
✅ उत्कृष्टपणे तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यावर लगेच पेंडिमिथिलिन या रासायनिक तणनाशकाची फवारणी करावी
✅ उगवणपश्चात तणनाशक अदामा अजिल किंवा टरगा सुपर यांचा पिक 20 ते 21 दिवसाच्या असताना करता येतो
✅ ठिबक, स्प्रिंकलर किंवा रेन पाईपने पाणी व्यवस्थापन करावे
✅ ट्रायकोडर्मा सुडोमोनास फ्लूरोसन्स, पॅसिलो, मेटारायझम या जैविक खतांचा व किडनाशकांची पावडर 1 किलो/ लिटर प्रति एकर ठिबक मधून किंवा पाण्याच्या पुढे जमिनीवर विस्कटून द्यावी
✅ पिक वाढीच्या अवस्थेनुसार पाण्यात विरघळणाऱ्या खताची फवारणी दर 8-10 दिवसांनी करावी
✅ एकात्मिक किड व रोग नियंत्रणासाठी जैविक किडनाशकाची (लेक्यानीसिलियम , बिव्हेरिया, नोमुरिया, बॅसिलस सबटीलीस, लॅक्टोबॅसिलस ) यांची फवारणी करावी
✅ 5% निंबोळी अर्काची दर 10 दिवसांनी फवारणी करावी
✅ विषमुक्त पालेभाज्या उत्पादनासाठी शिफारस असलेली किडनाशके, शिफारस केलेल्या मात्रेतच फवारावीत