विषमुक्त (Residue Free) पेरू उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  पेरू लागवड उन्हाळ्यात खड्डे करून भरून 3X2 मीटरवर करावी, निचऱ्याच्या जमिनीत लागवड करावी
  • ✅  आपला पेरू कोणत्या बाजाराला विक्री करताय तेथील मागणीचा विचार करा व वाण निवडा
  • ✅  फार मोठे क्षेत्रावर सुरुवातीस लागवड करू नका टप्प्याटप्प्यांनी क्षेत्र वाढवा
  • ✅  कमी अंतरावर लागवड असल्याने दर तीन महिन्याला छाटणी करावी
  • ✅  पहिले 1 ते दीड वर्ष झाडाला आकार द्या
  • ✅  मोजके पण आवश्यक तेवढे पाणी द्या
  • ✅  बाजारभावाचा अंदाज घेऊन बहार निवडा
  • ✅  पावसाळी बहार मध्ये जास्त उत्पादन मिळते
  • ✅  शेणखत, रासायनिक खत, निंबोळी पेंड, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक खते द्या म्हणजेच एकात्मिक खत व्यवस्थापन करावे
  • ✅  जैविक कीडनाशकांच्या (मेटारायझम, सुडोमोनास फ्लूरोसन्स, पॅसिलोमायसिस, ट्रायकोडर्मा) आळवण्या घ्याव्यात
  • ✅  जैविक वनस्पतीजन्य कीडनाशकांच्या फवारणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घ्या
  • ✅  एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचे पर्याय वापरा
  • ✅  शिफारस असलेली कीडनाशके, शिफारशीतील मात्रेतच घेऊन फवारा
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter