विषमुक्त (Residue Free)लिंबू उत्पादन तंत्रज्ञान
✅ हलक्या ते मध्यम जमिनीत 20X20 किंवा 20X10 फुटावर लागवड करावी
✅ खड्डे खोदून साई, सरबती या वाणाची लागवड करावी
✅ सुरूवातीचे 3 वर्ष झाडास आकार द्यावा
✅ चौथ्या वर्षापासून बहार धरावा
✅ हस्त बहारास बाजारभाव चांगला मिळतो त्याचे व्यवस्थापन करावे
✅ जुन मध्ये जीए 5 ग्रॅम / 100 लिटर पाणी, ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये चमत्कार 2 मिलि लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी
✅ बागेची 2-3 वर्षांनी टाचणी करावी
✅ एकात्मिक अन्नद्रव्य व्यस्थापन करावे त्यामध्ये शेणखत, सुक्ष्म अन्नद्रव्य, रासायनिक खते, जैविक खते वापरावी
✅ खैऱ्या रोगांचे नियंत्रणासाठी स्ट्रेप्टो व सिओसी च्या ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये फवारण्या घ्याव्यात
✅ बोर्डो पेस्ट / गेरूचा मुलामा पावसाळ्यापूर्वी व नंतर झाडाचे खोडास लावावा
✅ वाळलेल्या फांद्या, पाणसोट काढत राहावेत