विषमुक्त (Residue Free)केळी पीक लागवड तंत्रज्ञान
✅ ग्रँड 9 जातीची उती संवर्धित रोपाची लागवड करावी
✅ रोपाची नोंदणी वेळेत करून जानेवारी ते फेब्रुवारी किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत लागवड करावी
✅ जमिनीची चांगली मशागत करून 7X5 फुटावर लागवड करावी
✅ केळी बेडवर लागवड करावी त्यासाठी 3 फूट रुंद व पाऊण ते 1 फूट उंच बेड करावा
✅ केळीची लागवड चिखल करून करावी
✅ रोपांची शेतावर हार्डनिंग करावी
✅ केळी लागवडीनंतर कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करू नये
✅ एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये लागवडीनंतर 4 आळवण्या, कंदाचा विकास, केळीची वेन यावेळेस खते द्यावीत
✅ नियमितपणे मुनवे काढावेत
✅ सूक्ष्म अन्नद्रव्ये महिन्यातून एक वेळेस ठिबक मधून द्यावीत
✅ दोन इनलाइन लॅटरल केळीसाठी वापरावेत
✅ चिलिंग इंज्युरी येऊ नये म्हणून मल्चिंग पेपर वापरावा व इतर उपाययोजना कराव्यात
✅ फ्रुटकेअर बाबी बाबत स्वतः माहिती घ्यावी
✅ पोंगा भरणे आवश्यकता असेल तरच भरावेत