विषमुक्त (Residue Free) खरबूज लागवड तंत्रज्ञान

  • ✅  वाणाची निवड करताना कोणत्या बाजारपेठेत माल विक्री करणार आहोत याची माहिती घ्यावी
  • ✅  ज्यूस साठी स्थान‍िक मागणी असलेली वाण वेगळे आहेत, दूरच्या बाजारपेठेत पाठवण्याचे , लांबचे वाहतूकीसाठीचे वाण वेगळे आहेत त्याची माहिती घ्यावी
  • ✅  लागवडीचा कालावधी ठरवताना आपलेकडील हवामान, या फळाची बाजारातील मागणी याचा विचार करावा
  • ✅  दूरचे वाहतूकीसाठी वाणाची टिकवणक्षमता महत्वाची असते त्यासाठी बाजारपेठेत पोहचेपर्यंत मालाची टिकवण क्षमता टिकणे आवश्यक असते
  • ✅  त्यानुसार वाण व बाजारपेठेची माहिती घ्यावी
  • ✅  आगाप लागवडीसाठी म्हणजे नोव्हेंबर – डिसेंबर लागवडीसाठी निवडलेल्या वाणीची साली ची जाडी कमी असलेले, वेलीची कॅनोपी कमी असलेले वाण निवडावेत कारण हे वाण तसेही उन्हाळ्याचे सुरूवातीस बाजारात जात असतात त्याची टिकवणक्षमता चांगली असते, वाहतूकीसाठी चांगले असतात
  • ✅  या हंगामात जास्त साल जाड असलेली कॅनोपी, जास्त असलेले वाण निवडले तर प‍िक तयार होण्यास जास्त कालावधी लागतो
  • ✅  प‍िक काढणीस तयार झाले की नाही याबाबत माहिती करून घ्यावी
  • ✅  हे प‍िक एकाचचवेळी तोडणीस तयार होत नाही
  • ✅  याची काढणी 2-3 टप्यात करावी लागते
  • ✅  या पिकांच्या लागवडी एकत्र‍ित गट, ग्रुप करून करावी त्यामुळे नियमितपणे बाजारपेठेत माल पाठवता येतो त्याचवेळेस गटातील शेतकऱ्यांची एकमेकास प‍िक उत्पादन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करता येते
  • ✅  आगाप लागवडीसाठी शेताची वाफश्यावर मशागत करावी, ओल्या / आंबट ओल्या जमिनीत मशागत करू नका
  • ✅  जमिनीस विश्रांती दिलेल्या ठिकाणी लागवड करावी
  • ✅  या पिकानंतर त्याच बेडवर व मल्चींगवर कोणते पिक घेणार आहोत त्याप्रमाणे बेडचे अंतर ठेवावे
  • ✅  उदा
  • ✅  वांगे घ्यावयाचे असेल तर 6-7 फूट, म‍िरची घ्यावयाचे असेल तर 5-6 फूट
  • ✅  मल्चींग पेपर 25-35 मायक्रॉन शक्य झाल्यास 50 मायक्रॉन चा UV स्टॅबीलाईज्‍ड असावा
  • ✅  मल्चींग पेपरच्या दोन्ही बाजू संपूर्ण मातीने झाकुन घ्याव्यात त्यामध्ये हवा राहणार नाही याची काळजी घ्यावी
  • ✅  एकरी 5 ते 5
  • ✅  5 हजार रोपांची लागवड करावी, त्यामुळे खर्च कमी होतो
  • ✅  7 ते 7
  • ✅  5 हजार रोपे लागवडीमुळे रोपांचा, मल्चींग पेपरचा, आळवण्या, फवारणी चा खर्च वाढतो
  • ✅  परंतू उत्पादन वाढत नाही
  • ✅  लागवड दक्ष‍िण-उत्तर करावी
  • ✅  लागवडीपूर्वीची सर्व आंतरमशागत पूर्व-पश्च‍िम करावी शेवटी बेड दक्ष‍िण-उत्तर दिशेने सोडावेत
  • ✅  त्यामुळे सकाळी वेल पूर्वेस वाढतात तर दुपारी ते दक्ष‍िणेस वाढतात
  • ✅  त्यामुळे वेल शक्यतो बेड वर राहतात
  • ✅  ह‍िवाळी लागवडीसाठी नवीन क्रॉप कव्हर वापरावे
  • ✅  20-21 दिवस प‍िकावर लावावे तर उन्हाळी हंगामासाठी जुने पूर्वीचे क्रॉप कव्हर चालते 15-16 दिवस ठेवावे
  • ✅  क्रॉप कव्हर लागवडीनंतर 6/7 दिवसांनी टाकावे जेणेकरून रोपांची मर, पाणी व्यवस्थ‍ित पडते की नाही हे समजते रोपे सेट झाल्यावर क्रॉप कव्हर टाकावे
  • ✅  बेड वर एकच ओळ ड्रिपरचे बाजूस 10 सेमीवर लागवड करावी
  • ✅  “ ज्या शेतकऱ्याला या प‍िकाचे पाणी व्यवस्थापन कळले ते या प‍िकात यशस्वी होतात
  • ✅  कल‍िंगड हे प‍िक अत्यंत नाजूक, जोखमीचे असते, रोगास संवेदनक्षम प‍िक आहे
  • ✅  त्याची लागवड करायची तर अभ्यास करून माहिती घेवून करावी अन्यथा अपयश ठरलेले आहे
  • ✅  सोलापूर, अहिल्यानगर व साताऱ्यातील पूर्वेकडील भाग जो दुष्काळी पट्टा समजला जातो, ज्या ठिकाणी 15 ऑगस्ट पर्यंत खूप कमी पाऊस पडतो, जमिनी हलक्या स्वरूपाच्या, उताराच्या व उत्तम निचऱ्याच्या आहेत त्या ठिकाणी एप्र‍िल, मे, जुन मध्ये लागवड केली तर ती फळे जुन, जूलै मध्ये व‍िक्रीसाठी तयार होतात
  • ✅  त्यास उत्तर भारतात चांगला बाजारभाव मिळू शकतो
  • ✅  या भागातील शेतकऱ्यांनी हा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही
  • ✅  मादी फूलांची संख्या वाढवण्यासाठी 100 PPM एनएए 2 फवारण्या पिकाचे 2 पानाची अवस्था व त्यानंतर 1 आठवड्यानी घ्याव्यात
  • ✅  प्रत्येकी वेलीवर 2-3 फळे ठेवावीत
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter