विषमुक्त (Residue Free) पपई पिकाचे लागवड तंत्रज्ञान
✅ पपईची लागवड दुष्काळी भागात हलक्या ते मध्यम काळ्या निचऱ्याच्या जमिनीत करावी
✅ लागवड सप्टेंबर–ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये करावी
✅ लागवडीसाठी रेड लेडी किंवा 15 नंबर वाण निवडावा
✅ खात्रीशीर नर्सरीमधून 6 आठवड्यांची रोपे खरेदी करावीत
✅ लागवड 8x8 किंवा 8x7 फूट अंतरावर करावी व बेड किमान 4 फूट रुंद व 1 फूट उंच ठेवावा
✅ पपई पिकासाठी शेणखत (10 टन ), 3-4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 100-200 किलो निंबोळी पेंड 4
बॅग संयुक्त रासायनिक खते, अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये ट्रोड II – 10 किलो बेसल डोस मध्ये द्यावे
✅ पपईस पाण्यात विरघळणारी खते सोडू नयेत
✅ पाणी नियमित द्यावे आणि सुरुवातीचे 4 महिने कमी द्यावे
✅ ट्रायकोडर्मा, मेटारायझम, पॅसिलोमायसिस, PSB, KMB यांची दोन वेळा आळवणी करावी
✅ विषाणूंपासून संरक्षणासाठी मावा या रसशोषक किडीचे नियंत्रण करावे
✅ पिकावर जैविक/अजैविक ताण येणार नाही याची काळजी घ्यावी
✅ एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे