काजू @ डॉलर अर्नर पिक

  • ✅  आपल्याकडील प्रक्रिया उद्योगास कच्चामाल उपलब्ध होण्यासाठी व पडीक तथा हलक्या जमिनीत मधून निश्चित उत्पन्न मिळवण्यासाठी काजूची लागवड करावी
  • ✅  कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा तसेच पूर्व विदर्भामध्ये काजू लागवड फायदेशीर ठरू शकते
  • ✅  काजूची लागवड 7 × 7, 6 × 6 किंवा 5 × 5 मीटर अंतरावर करावी
  • ✅  लागवडीचे वेळेसच ठिबक यंत्रणा कार्यान्वित करावी
  • ✅  कोकणामध्ये वेंगुर्ला 7 तर उर्वरित महाराष्ट्र मध्ये वेंगुर्ला 9 या वाणाची लागवड करावी
  • ✅  काजूची कलमे शक्यतो शासकीय रोपवाटिकेमधून विकत घ्यावीत
  • ✅  जैविक खते तसेच जैविक किडनाके तथा बुरशीनाशकाच्या नियमितपणे फवारणी व आळवण्या घ्याव्यात
  • ✅  कलमाच्या जोडा खालून आलेली फूट नियमितपणे काढावी, झाडास डेरेदार आकार देण्यासाठी छाटणी करावी
  • ✅  झाडास नियमितपणे पाणी व्यवस्थापन करावे
  • ✅  सुरुवातीचे 3 4 वर्षे कडधान्य, फुलपिके, भाजीपाला पिके अंतरपीके घ्यावीत
  • ✅  कलमास वर्षातून 3 वेळा रासायनिक खत व एक वेळेस शेणखताचा डोस द्यावा
  • ✅  ढेकण्या, रोठा, रस शोषण करणाऱ्या किडी तसेच करपा व फांदीमर या किड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे
  • ✅  ट्रायकोडर्मा, मेटाराईझम,प्यासीलोमायसिस, सुडोमोनासास व बिवेरिया यांच्या आळवण्या घ्याव्यात
  • ✅  पावसाळ्यापूर्वी पावसाळा संपल्यानंतर गेरूच्या मुलामा खोडास शक्य होईल तेवढ्या उंचीपर्यंत लावावा
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter