आरोग्यदायी व बहुगुणी आवळा लागवड तंत्रज्ञान
✅ कमी उत्पादन खर्चाचे कोरडवाहू फळपिक
✅ आरोग्यदायी आणि बहुगुणी असल्यामुळे दिवसेंदिवस मागणी वाढत आहे
✅ महाराष्ट्रामधील सर्व विभागामध्ये उत्तम प्रकारे लागवड होऊ शकते
✅ हलक्या, मध्यम,डोंगर उताराच्या पडीक व उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये लागवड करावी
✅ नरेंद्र आवळा 7, चकैया व कांचन या वाणाची लागवड 2:2:1 या प्रमाणात करावी
✅ खात्रीच्या रोपवाटिकेमधून दर्जेदार,किड व रोगमुक्त आणि योग्य त्या वाणाची कलमे खरेदी करावीत
✅ लागवडीचे अंतर 15 × 15 किंवा 15 ×12 फूट ठेवावे
✅ शक्यतो एक मीटर उंची पर्यंत एक खोड ठेऊन त्यानंतर 4 -5 फांद्याचा विस्तार करून घेऊन झाडास आकार द्यावा
✅ झाडाचे वय व विस्तार त्यानुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे
✅ लागवडी पूर्वी ठिबक यंत्रणा कार्यान्वित करून सुरुवातीचे दोन वर्षे एक इनलाईन लॅटरल व त्यानंतर दोन इनलाइन लॅटरल, दोन लिटर डिस्चार्जचे ड्रिपर प्रत्येकी 1- 2 फुटावर असावेत
✅ झाडाचे वय,पिक वाढीची अवस्था व जमिनीचा प्रकारानुसार पाणी व्यवस्थापन करावे
✅ जैविक खते तसेच जैविक किडनाशकाच्या आळवण्या कराव्यात
✅ सुरुवातीचे 3 - 4 वर्षे कडधान्य वर्गीय आंतरपिके घ्यावीत
✅ पावसाळ्यापूर्वी व पावसाळा संपल्यानंतर गेरूचा मुलामा मुख्य खोडास शक्य होईल तेवढ्या उंचीपर्यंत द्यावा
✅ एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे
✅ प्रक्रिया उद्योगाची जोड दिल्यास नियमित रोजगार व उत्पन्नात वाढ होते