खजूर लागवड @ चार पिढ्यांची सोय

  • ✅  सध्या लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या बागाची पाहणी करून, शास्त्रोक्त माहिती घेऊनच खजूर लागवडीचा निर्णय घ्यावा
  • ✅  कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातील हवामान खजूर लागवडीस अनुकूल आहे
  • ✅  मध्यम ते भारी परंतु उत्तम निचऱ्याची जमीन लागवडीसाठी निवडावी
  • ✅  बारही वाणाची लागवड करावी
  • ✅  या वाणाची ताजी फळे विक्रीसाठी आपल्याकडे भरपूर वाव आहे
  • ✅  लागवडीसाठी टिशू कल्चर ची रोपे किंवा मुनवे वापरावेत
  • ✅  लागवडीचे अंतर 8 × 8 मीटर ठेवावे
  • ✅  सेंद्रिय तथा भर खताचा वापर भरपूर करावा
  • ✅  जीवामृत तसेच शेण स्लरी चा वापर नियमितपणे करावा
  • ✅  जैविक खते तसेच जैविक किडनाशकांचा वापर फवारणीसाठी व आळवणीसाठी पावसाळ्यात आणि हिवाळी हंगामात नियमित करावा
  • ✅  लागवडी पूर्वी ठिबक यंत्रणा बसवून पाणी व्यवस्थापन आवश्यकतेप्रमाणे करावे
  • ✅  परागीकरण करण्यासाठीचे ज्ञान व कौशल्य आत्मसात करून घ्यावे
  • ✅  लागवडीनंतर सुरुवातीचे 3 - 4 वर्ष कडधान्य वर्गीय आंतरपीके घ्यावीत
  • ✅  फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर घडाभोवती प्लास्टिक पिशवी बांधावी
  • ✅  घडाच्या आजूबाजूच्या 3 - 4 फांद्यावरील काटे काढून घ्यावेत
  • ✅  गेंड्या भुंगा, रेड पाम विवील, फळ खाणारी अळी आणि पोंगेमर, पानावरील ठिपके इत्यादी किड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे
  • ✅  जास्त उत्पन्नासाठी शक्यतो स्वतःची विक्री व्यवस्था उभारावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter