स्ट्रॉबेरी लागवड कुठे करता येईल ? आणी त्यासाठीचे तंत्रज्ञान
✅ रब्बी हंगाम मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम परंतु उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करता येते
✅ वाफश्यावर मशागत तयार करून 3 - 4 फूट रुंदीचे बेड तयार करून घ्यावेत व मल्चिंग पेपर अंथरून लागवड करावी
✅ लागवडीसाठी विश्वासू,खात्रीशीर रोपवाटिके मधून आपल्या परिसरात उत्कृष्ट उत्पादन देणाऱ्या वाणाच्या रोपांची खरेदी करावी
✅ 30 × 30 सेंटिमीटर अंतरावर ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये लागवड करावी
✅ राणीया, नाबेला, कॅमारोजा, फेस्टिवल पर्ल, विंटर डाऊन, स्वीट चार्ली, फॉर्च्यूना या वाणाची लागवड करावी
✅ ट्रायकोडर्मा, मेटारायझम, सुडोमोनस, पॅसिलोमायसिस व बिव्हेरिया यांची आळवणी हंगामात दोन वेळेस करावी
✅ शेणस्लरी व जिवामृत यांच्या नियमितपणे आळवण्या घ्याव्यात
✅ एकात्मिक अन्नद्रव्यवस्थापन करावे त्यासाठी बेसल डोस तसेच पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर पीक वाढीच्या अवस्थेनुसार करावा
✅ ठिबक किंवा मायक्रो स्प्रिंकलर या पाणी देण्याच्या पद्धतीचा वापर करून पिक वाढीचे अवस्था,हंगामातील वातावरण यानुसार पाणी व्यवस्थापन करावे
✅ रोप कुरडतरणारी अळी, पाने खाणाऱ्या अळ्या, तुडतुडे, फुलकिडे, मावा, लाल कोळी तसेच मर, काळी कुज, करपा, इत्यादी रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे
एकच बाजारपेठेवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या बाजारात तसेच हात विक्री करून उत्पादनात उत्पन्नात वाढ होऊ शकते