ड्रॅगन फ्रुट एक आरोग्यदायी फळ @ डाळिंबास पर्याय ?

  • ✅  covid-19 नंतर प्रकाश झोतात आलेले प्रतिकारक्षमता वाढवणारे एक महत्त्वाचे फळपिक
  • ✅  कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये लागवडी पोषक हवामान
  • ✅  अत्यंत हलक्या जमिनी तसेच कमी पाण्यावर येणारे परंतु हमखास जास्त बाजारभाव असलेले फळपिक
  • ✅  कोणत्याही जमिनीत लागवड करता येते परंतु उत्तम निचरा आवश्यक
  • ✅  सिमेंटचे पोल व चकत्यासाठी सुरुवातीचा भांडवली खर्च जास्त
  • ✅  सध्या ज्या शेतकऱ्यांनी लागवडी केलेले आहेत त्यांच्याकडील बागांची पाहणी करून तसेच शास्त्रोक्त माहिती घेऊन नंतरच लागवडीचा निर्णय घ्यावा
  • ✅  वाण निवड : साल व गर गुलाबी आणी साल सोनेरी पिवळी तर गर पांढरा या दोन पैकी एका वाणाची लागवड करावी
  • ✅  रोपे स्वतः तयार करावीत किंवा खात्रीच्या रोपवाटीकेमधून विकत घ्यावीत
  • ✅  10 × 6 फूट या अंतरावर पोल रोवावेत व पोलच्या चार दिशेष प्रत्येकी एक रोप लावावे
  • ✅  बेडवर लागवड करावी परंतु बेडची उंची मर्यादित ठेवावी
  • ✅  पिकाची शास्त्रशुद्ध लागवड पद्धत बाबत माहिती घेऊन त्याप्रमाणे पीक व्यवस्थापन व छाटणी करावी
  • ✅  शेणखत तथा सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करावा
  • ✅  शेण स्लरी व जिवामृत याची नियमितपणे आळवणी करावी
  • ✅  जैविक खते तथा किडनाशकांच्या नियमितपणे आळवण्या व फवारण्या घ्याव्यात
  • ✅  पावसाळ्यात आवश्यकतेप्रमाणे, हिवाळ्यात भरपूर तर उन्हाळ्यात अत्यंत कमी पाणी द्यावे
  • ✅  प्रति पोल 10-15 किलो शेणखत 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत व 500 ग्रॅम लिंबोळी पेंड याप्रमाणे बेसल डोस द्यावा
  • ✅  बागेमध्ये शक्यतो तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करू नये
  • ✅  पीक वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यकतेप्रमाणे पाण्यात विरघळणारऱ्या खतांचा वापर करावा
  • ✅  किड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे
  • ✅  विक्रीसाठी एकाच बाजारावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या बाजारात व स्वतः हात विक्री केल्यास उत्पन्नामध्ये निश्चित वाढ होते
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter