बोर लागवडीतून ₹ मिळतात का ? त्यासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान कोणते ?
✅ आपल्याकडील पारंपरिक फळपिक, आजही शहरी भागामध्ये जास्त मागणी असल्यामुळे या पिकातून किफायतशीर उत्पन्न मिळू शकते
✅ सुधारित तसेच काही आयात केलेले वाणाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे
✅ हलक्या ते मध्यम परंतु उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये लागवड करावी
✅ बाजारातल्या मागणीनुसार वाणाची निवड करावी
✅ थाई ॲपल बोर, काश्मिरी रेड सुंदरी व चकनट वाणास जास्त मागणी व बाजारभाव आहे
✅ खात्रीच्या रोपवाटिकेमधून दर्जेदार, किड व रोगमुक्त आणी लागवड करावयाच्या वाणाची कलमे विकत घ्यावीत
✅ जमिनीच्या व वाणाच्या वाढीच्या प्रकारानुसार लागवडीचे अंतर ठेवावे
✅ लागवडीचे अंतर 15 × 10 किंवा 12 × 10 फूट ठेवावे
✅ लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी मुळ्यांचा विस्तार व 4-5 खोड तयार करून घ्यावेत
✅ त्यानंतर दरवर्षी जमिनीपासून एक फूट अंतरावर खोड, सर्व फांद्याची छाटणी करून बहार धरावा
✅ जमिनीचा प्रकार, पिक वाढीची अवस्था व हंगामातील वातावरणानुसार पाणी व्यवस्थापन करावे
✅ ट्रायकोडर्मा, मेटाराईझम, पॅसिलोमायसिस, सुडोमोनासास व बिव्हेरिया यांच्या आळवण्या घ्याव्यात
✅ शेण स्लरी तसेच जिवामृत नियमितपणे वापरावे
✅ पाने खाणाऱ्या अळ्या, रस शोषणारी किडी, फळमाशी, भुरी च्या बंदोबस्तासाठी एकात्मिक किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात