चिंच.... कमी कष्टात कमी खर्चात सात पिढ्यांची तरतूद

  • ✅  चिंच लागवड करताना बांधावर करणार आहात की व्यापारी दृष्टी ने करणार आहात यानुसार लागवडीचे नियोजन करावे
  • ✅  कोरडवाहू व बागायती चिंच लागवड या दोन्ही प्रकारचे लागवडीचे संपूर्ण नियोजन वेगळे करावे
  • ✅  चिंचेसाठी हलकी,मुरमाड, माळरान, उताराची जमीन चालते
  • ✅  कोरडवाहू चिंच लागवडीसाठी सुरुवातीची 2-3 पाण्याची आवश्यकता असते
  • ✅  व्यापारी दृष्ट्या चिंच लागवडीसाठी वर्षभर पाण्याची सोय असावी लागते
  • ✅  चिंच लागवडीपूर्वी 1× 1 × 1 मि आकाराचे खड्डे खोदून उन्हात चांगले तापून द्यावेत व ते जूनच्या पहिल्या आठवड्यात
  • ✅  शास्त्रोक्त पद्धतीने भरून घ्यावेत
  • ✅  शिवाई,प्रतिष्ठान,नंबर :263 या वाणाची कलमे कृषी विद्यापीठ कडून आगाऊ नोंदणी करून मिळवावीत
  • ✅  लागवडीनंतर दर 4 महिन्यांनी पिकास रासायनिक खताचा डोस द्यावा, जून मध्ये शेणखत द्यावे
  • ✅  शक्यतो ठिबक वर लागवड करावी त्यासाठी इनलाईन पहिल्या वर्षी एक तर तिसऱ्या वर्षीपासून दोन इनलाईन लॅटरल
  • ✅  वापराव्यात
  • ✅  सुरुवातीचे 4-5 वर्षे आंतरपिकाची लागवड करावी
  • ✅  लागवडीनंतर 1मि
  • ✅  पर्यंत मुख्य खोडाची वाढ झाल्यानंतर शेंडा मारावा व त्याखाली निघणाऱ्या 4 ते 5 फांद्या ठेवून झाडास
  • ✅  आकार द्यावा
  • ✅  वेळोवेळी कलमाखालची फूट काढून घ्यावी
  • ✅  जून -जुलै,ऑक्टोबर -नोव्हेंबर व जानेवारी- फेब्रुवारी मध्ये येणाऱ्या नवीन पालवीचे कीड व रोगापासून संरक्षण करावे
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter