विषमुक्त (Residue Free) भुईमूग उत्पादन तंत्रज्ञान
✅ खरिप व रब्बी हंगामात कमी क्षेत्रावर लागवड करावी
✅ उन्हाळी लागवड करावी
✅ एकरी झाडाची संख्या योग्य ठेवावी
✅ त्यासाठी 22-30 सेमी X 10-15 सेमी अंतरावर पेरणी करावी
✅ BBF पेरणी यंत्राणे पेरणी करावी
✅ एकरी 25-35 किलो बियाणे वापरावे
✅ सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 3 बॅग शेणखतासह बेड मध्ये भरावे शेवटचे पाळी अगोदर टाकावे
✅ पेरणीचे वेळी रायझोबियम, ट्रायकोडर्मा, केएमबी, पीएमबी, बिज प्रक्रिया करावी
✅ DAP 1 बॅग एकरी पेरणीचे वेळी खत द्या
✅ पेरणीनंतर लगेच गोल फवारणी करावी 25-30 दिवसांनी 1 कोळपणी करावी
✅ पाण्याचे पाळ्या पिक उगवणीचे वेळी, फुलोरा अवस्था, आऱ्या सोडण्याचे वेळी व दाणे भरणे अवस्थेत पाणी द्याव्यात
✅ प्रतिबंधात्मक म्हणून जैविक किडनाशकांच्या (सुडोमोनास फ्लूरोसन्स, लेक्यानीसिलीयम लेक्यानी, बॅसिलस सबटीलस) फवारणी कराव्यात
✅ किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास रासायनिक किडनाशकांची शिफारशीतील मात्रा घेवून फवारणी करावी