विषमुक्त (Residue Free) सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान
✅ जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवडा
✅ मध्यम जमिनीत - जे एस 335, 9365, 9560 भारी जमिनीत - MAUS -612, फुले संगम, फुले किमया, फुले दूर्वा
✅ हलक्या जमिनीत सोयाबीन पेरू नका
✅ रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पेरणी यंत्राद्वारेच 45X15 हलक्या / मध्यम जमिनीत व 60X15 भारी जमिनीत सोयाबीन पेरावे
✅ घरच्या सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता तपासावी
✅ बिजप्रक्रिया-रासायनिक व ट्रायकोडर्मा, पीएसबी, रायझो व केएमबी करावी
✅ एकरी 20 किलो पेरणीसाठी तर टोकणसाठी 16 किलो बियाणे वापरा
✅ उगवणपूर्व तणनाशक-पेंडीमिथिलिन व नंतर 20-35 दिवसांनी 2 कोळपणी करा अथवा उगवणपश्चात तणनाशके तणे 2-3 पानावर असताना फवारून तण नियंत्रण करावे
✅ खोडअळी व चक्रीभुंगाचे प्रादुर्भाव ओळखण्यासाठी रोपे उलटून तपासणी करा व नियंत्रणाचे उपाय करा
✅ पावसाचा खंड पडल्यास संरक्षित पाणी द्या
✅ एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, भारी आम्लयुक्त जमिनीत सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग पेरणीपूर्वी द्यावे
✅ डीएपी सोबत सल्फर 4 किलो एकरी द्यावा
✅ पीक वाढीच्या अवस्थेनुसार पाण्यात विरघळणारी खते फवारणी सोबत घ्यावीत
✅ कीड व रोगांसाठी नियमित पीक पाहणी करावी व प्रतिबंधात्मक निंबोळी अर्क, लेक्यानीसिलियम, नोमुरिया, बॅसिलस यांचा वापर करावा
✅ किडनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास शिफारस असलेली कीडनाशके योग्य त्या मात्रेत घेऊन फवारणी करावी
✅ फवारणीसाठी कोणतेही टॉनिक, आळवण्यासाठी ह्युमिक वापरू नका त्याची काही गरज नसते