✅ लागवडीचे अंतर कमी करून झाडाची संख्या वाढवणे म्हणजेच सघन कापूस लागवड करणे
✅ मध्यम जमिनीत 3 X 1/2 फूट व भारी जमिनीत 3 X 1 फूट अंतरावर लागवड करावी
✅ 40% नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश व शेणखतासोबत लागवडी पूर्वी द्यावा
✅ नत्राची गरज असेल तरच पुन्हा वापरावा
✅ चमत्कार हे वाढ नियंत्रक 40-45 दिवसानी 200 मिली व त्यानंतर 15 दिवसांनी 225 मिली एकरी याप्रमाणे फवारण्या घ्याव्यात
✅ पहिले पाते लागल्यावर गळफांद्या कात्रीने कापून घ्याव्यात
✅ सघन लागवडीमध्ये कापसाचे सरळ वाढणारे वाणाची लागवडीसाठी निवड करावी
✅ कापसाची वाढ 3-4 फूट झाल्यावर झाडाचा मुख्य शेंडा मारावा
✅ प्रति झाड 15-20 बोंडे मिळतात त्यातून एकरी कमी खर्चात 12-15 क्विंटल उत्पादन मिळते