विषमुक्त (Residue Free) आद्रक (आले) उत्पादन तंत्रज्ञान
✅ आद्रक लागवडीसाठी मध्यम प्रतिची काळी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी
✅ फुले माहिम (सातारी),रिओ-दि-जेनिरो, वरदा व नादिया या सुधारित वाणाची लागवड करावी
✅ दर पाच वर्षांनी बेणेबदल करावी
✅ रूंद वरंबा सरी (बेड) वर लागवड करावी
✅ बेण म्हणून 8/10 क्विं
✅ जेठे गड्डे वापरावेत
✅ ट्रायकोडर्मा, ॲझोस्पिरिलियम ॲझेटोबॅक्टर, पॅसिलोमायसिस, स्फुरद पाण्यात विरघळणारे जिवाणू व पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू ची बिजप्रक्रिया करावी
✅ शेणखत (15-20 टन),लिंबोळी पेंड (100-200 किलो) व सिंगल सुपर फॉस्फेट 3-4 बॅग व इतर नत्र स्फुरद व पालाश युक्त संयुक्त खताचा बेसल डोस द्यावा
✅ ठिबकद्वारे - दोन इनलाईन, १ फूटावर २ लिटरडिस्चार्जचे ड्रिपर पाणी व्यवस्थापन करावे
✅ लागवड 30X30 किंवा 30X20-25 सेमी अंतरावर करावी
✅ वेळोवेळी पिकास भर द्यावी
✅ कंदकुज, खोडमाशी व सुत्रकृमीसाठी मातीमधून बायोमिक्स किंवा बिजप्रक्रियेसाठी वापरलेली जैविक किडनाशकांचा हंगामामध्ये दोन वेळा आळवणीसाठी वापर करावे
✅ सुक्ष्म अन्नद्रव्याचा फवारणीद्वारे वापर करावा किंवा लागवडीपूर्वी सुक्ष्मअन्नद्रव्य ग्रेड - II एकरी 10-20 किलो वापरावे
✅ हळद काढणी यंत्राने पिकाची काढणी करावी