तिळ @ आरोग्यवर्धक तेलबिया पिक

  • ✅  खरीप, अर्ध रब्बी आणि उन्हाळी हंगामात या पिकाची लागवड करता येते
  • ✅  खरीप हंगामासाठी मध्यम जमीन तर रब्बी व उन्हाळ्यामध्ये मध्यम ते भारी व उत्तम निचऱ्याची जमीन लागवडीसाठी निवडावी
  • ✅  तिळाचे बियाणे लहान असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी
  • ✅  AKT 101, पीकेव्ही -एनटी -11-91, वेस्टर्न 11, इंडो 21, दप्तरी 12, श्वेता जेएलटी 7 इत्यादी वाण लागवडीसाठी उपलब्ध आहेत
  • ✅  खरीपामध्ये 45 ×15 तर रब्बीमध्ये 30 × 15 सेमी अंतरावर पेरणी करावी
  • ✅  पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा, अझाटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारी जिवाणू व पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणूची बिजप्रक्रिया करावी
  • ✅  खरीप पेरणी 15 जुलै,अर्ध रब्बी 15 सप्टेंबर तर उन्हाळी तिळाची पेरणी 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावी
  • ✅  बियाणे लहान असल्यामुळे 1:4 प्रमाणात वाळू/गांडूळ खत / लिंबोळी पेंडीमध्ये मिसळून पेरणी करावी
  • ✅  उगवण पूर्ण तणनाशक पेंढ्यामिथिलिन चा वापर व 25 ते 30 दिवसांनी कोळपणी करून प्रभावी तण नियंत्रण होते
  • ✅  हंगामनिहाय आवश्यकतेप्रमाणे,जमिनीच्या प्रकारानुसार व पिक वाढीच्या अवस्थेनुसार पिकास पाणी द्यावे
  • ✅  शेणखत 2 टन व नत्र, स्फुरद व पालाश 20:10:10 याप्रमाणे एकात्मिक खत व्यवस्थापन करावे
  • ✅  पिकवाढीच्या अवस्थेनुसार पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर केल्यास उत्पादनामध्ये भरीव वाढ होते
  • ✅  तिळ पिकावर पाने खाणाऱ्या अळ्या, बोंड पोखरणारी अळी, गाद माशी या किडी तर मर, खोडकूज, मुळकुज, पानावरील ठिपके, करपा, भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाचे उपाय योजावेत
  • ✅  80 % पिक तयार झाल्यावर पिकाची काढणी करून पेंड्या बांधून त्याच्या झोपड्या ताडपत्री वर उन्हात वाळू द्याव्यात
  • ✅  जसजशी बोंडे वाळतील तस तसे बी खाली पडते, शेवटी शेंड्याकडील बोंडाची मजुराच्या द्वारे काठीने झोडपनी करून धान्य स्वच्छ करून चांगल्या बारदाण्यात भरून ठेवावे
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter