जवस महत्त्वाचे आरोग्यदायी तेलबिया पिक

  • ✅  ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा उत्तम स्त्रोत व एक उत्तम अँटिऑक्सिडंट
  • ✅  दिवसेंदिवस जवसाची जागतिक मागणी वाढत आहे
  • ✅  रब्बी हंगामात लागवडीसाठी एक उत्तम पर्याय पिक
  • ✅  भात तसेच सोयाबीन नंतर फेरपालटीसाठी एक उत्तम पर्याय
  • ✅  मध्यम ते भारी ओलावा टिकून ठेवणारी जमीन लागवडीसाठी निवडावी
  • ✅  जवस बी लहान असल्यामुळे पेरणीपूर्वी जमिनीत चांगली मशागत करावी
  • ✅  नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ते डिसेंबर मध्ये पेरणी करावी
  • ✅  पेरणीसाठी 30 ×10 सेंटीमीटर अंतर ठेवावे
  • ✅  PKVNL- 260,लातूर जवस -93,पीडीकेवी -शारदा आणि पुसा - 2 हे वाण लागवडीसाठी वापरावेत
  • ✅  पेरणीपूर्वी बियाणास ऍझोटोबॅक्‍टर,ट्रायकोडर्मा,स्फुरद विरघळणारे जिवाणू व पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणूंची बिजप्रक्रिया करावी
  • ✅  एकरी 4 किलो बियाणे पेरणीसासाठी वापरावे
  • ✅  24 किलो नत्र,12 किलो स्फुरद व पालाश प्रत्येकी आणी 2 टन शेणखत एकरी बेसल डोस म्हणून द्यावे
  • ✅  पाच ग्रॅम झिंक सल्फेट अधिक 3 ग्रॅम बोरॅक्स प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन पेरणीनंतर 45 दिवसांनी फवारणी करावी
  • ✅  फुलकळी अवस्थेत तसेच बोंडे भरण्याची अवस्थेमध्ये 75 पीपीएम सॅलीसिलिक ऍसिड ची फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते
  • ✅  फुलोऱ्यापूर्वी एक पाणी व त्यानंतर 20 - 25 दिवसांनी दुसरे पाणी पिकास द्यावे
  • ✅  गादमाशी, मर रोग,बुरशीजन्य करपा,भुरी इत्यादी किड व रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे
  • ✅  पिकाची पाने व बोंडे पिवळी पडल्यावर पीक काढणीस तयार झाले असे समजून पिकाची कापणी करून मळणी करून घ्यावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter