मोहरी उच्च उत्पादन तंत्रज्ञान

  • ✅  सोयाबीन खालोखाल महत्त्वाचे तेलबिया पिक, मोहरीच्या तेलाचा उत्तर भारतामध्ये स्वयंपाकासाठी मोठा प्रमाणात वापर केला जातो
  • ✅  रब्बी हंगामातील वातावरण मोहरी पिकास मानवते
  • ✅  मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची जमीन मोहरीसाठी निवडावी
  • ✅  10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत पेरणी करावी
  • ✅  TTM 108-1, शताब्दी हे कृषी विद्यापीठाचे वाण तर पायोनियर, स्टार, बायर या खाजगी बियाणे उत्पादकांची वाण लागवडीसाठी निवडावेत
  • ✅  एकरी 1-दीड किलो बियाणे पेरावे
  • ✅  बियाणे लहान असल्यामुळे 1:3-4 प्रमाणात बियाण्यात वाळू मिसळून पेरणी करावी
  • ✅  पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा, पीएसबी व केएमबीची बिज प्रक्रिया करावी
  • ✅  30 - 45 × 5- 10 सेमी अंतरावर पेरणी यंतत्राद्वारे पेरणी करावी
  • ✅  उगवणपूर्व तणनाशक फ्ल्यूक्लोरॅलिन किंवा ऑक्सिडायझीऑन वापरावे
  • ✅  20 किलो नत्र व 16 किलो स्फुरद एकरी पेरणीच्या वेळी बियाच्या खाली द्यावे
  • ✅  पीक वाढीची अवस्थेनुसार पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर करावा
  • ✅  20 - 25 दिवसाच्या अंतराने 3 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात
  • ✅  रस शोषण करणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळ्या, भुरी व केवडा रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाचे उपाय करावेत
  • ✅  झाडाच्या 90% शेंगा पिवळ्या पडल्यानंतर पिकाची काढणी करावी
  • ✅  7 - 8 दिवस पिक शेतात वाळू द्यावे व त्यानंतर मळणी करावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter