बेबी कॉर्न आणी स्वीट कॉर्न लागवड तंत्रज्ञान
✅ अल्पकालावधीमध्ये उच्च दर्जाचा हिरवा चारा, उत्कृष्ट फेरपालटीचे,उच्च उत्पन्न देणारे पिक
✅ वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस मागणीत वाढ होत आहे त्यामुळे वर्षभर लागवडीची संधी उपलब्ध होत आहेत
✅ मध्यम ते भारी, काळी, खोल, कसदार परंतु उत्तम निचऱ्याची जमीन लागवडीसाठी निवडावी
✅ जून - जुलै, सप्टेंबर - ऑक्टोबर व जानेवारी - फेब्रुवारी या कालावधीमध्ये लागवड करावी
✅ बेबीकॉर्न साठी शक्यतो करार शेतीचा पर्याय निवडावा तर स्वीट कॉर्नची विक्री बाजारपेठेत करावी लागते
✅ बाजारातील मागणीचा विचार करून वाणाची निवड करावी
✅ जोड ओळ पद्धतीने ( चिनी पद्धत ) लागवड केल्यास जास्त रोपे बसतात व उत्पादनात वाढ होते
✅ 60 : 25 : 25 एनपीके, 5 टन शेणखत आणि आवश्यकतेप्रमाणे सूक्ष्मअन्नलद्रव्याचा वापर करावा
✅ उगवण पूर्व तणनाशक अट्रॅझीन किंवा उगवण पश्चात तणनाशक टेम्बोट्रिन किंवा टोप्रामोझेन त्यांचा वापर करून तण नियंत्रण करावे
✅ शक्यतो ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन करावे, पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी
✅ अमेरिकन लष्करी अळी, पाने खाणाऱ्या अळ्या व रस शोषण करणाऱ्या किडीचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करावे
✅ बेबीकॉर्न ची काढणी 3 -4 टप्प्यात तर स्वीट कॉर्नची काढणी एकाच टप्प्यात करावी
✅ बेबीकॉर्नचे अडीच टन तर स्वीट कॉर्नचे 6-8 टन एकरी उत्पादन मिळते त्यापासून 75 हजार रुपये एकरी उत्पन्न होऊ शकते
✅ कणसे काढल्यानंतर ताबडतोब चाऱ्याची विक्री करावी किंवा मुरघास तयार करावा