बांबू- सोन्याची काठी गरीबाचे सोने

  • ✅  फक्त उत्पन्नच देत नाही तर मृद व जलसंधारण साठी अत्यंत उपयुक्त
  • ✅  हलक्या,खडकाळ, पडीक आणि कोरडवाहू जमिनीमध्ये लागवड करता येते
  • ✅  एक वेळेस लागवड केल्यावर 50 - 60 वर्षे उत्पन्न मिळते
  • ✅  रानटी तथा जंगली प्राण्यापासून पिकास धोका नसतो
  • ✅  आपल्या परिसरात येणारे बांबूचे प्रकार व बांबू लागवड करण्याचा उद्देश यानुसार बांबूचा प्रकार तथा वाणाची निवड करावी
  • ✅  विदर्भ आणि खानदेशामध्ये मानवेल आणि काटस यांची लागवड करावी
  • ✅  पर्वतरांगा व डोंगराळ भागात माणगाव,वूडा, काटस, मानवेल, तुल्ड डा वाणाची लागवड करावी
  • ✅  कमी पावसाच्या प्रदेशात मानवेल,काटस आणि टूलडा वाण लागवडीसाठी निवडावेत
  • ✅  3 × 3 किंवा 4 × 2 मीटर या अंतरावर लागवड करावी
  • ✅  दरवर्षी प्रत्येक बेटाला 200 - 600 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत वर्षातून 3 वेळेस द्यावे जेवढे जास्त खत आणि पाणी तेवढी बांबूची वाढ चांगली होते
  • ✅  बांबू बेटे नियमित साफ करून घ्यावीत
  • ✅  खोडकिडा,खोडकूज, शेंडा अळी इत्यादी किडीचे वेळीच नियंत्रण करावे
  • ✅  गोमूत्र आणि लिंबोळी अर्काची नियमित फवारणी करावी
  • ✅  दरवर्षी नविन येणाऱ्या बांबूला " बांबू मिशन " यांनी सुचविलेला विशिष्ट रंग द्यावा
  • ✅  पहिली बांबूची तोडणी चौथ्या वर्षी करता येते त्यानंतर दरवर्षी बांबूची काढणी करावी, काढणीसाठी विशिष्ट प्रकारच्या करवती वापराव्यात
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter