चंदन लागवड तंत्रज्ञान, अर्थकारण, समज आणि गैरसमज

  • ✅  चंदन लागवडीसाठी कोणत्याही शासकीय परवानगीची गरज नाही
  • ✅  चंदन तोडणीसाठी महसूल व वन विभागाची परवानगी घ्यावी लागते
  • ✅  चंदनची लागवड सलग क्षेत्रावर किंवा बांधावर करावी
  • ✅  चंदन लागवड हलक्या, डोंगर उताराच्या,मुरमाड व पडीक जमिनीत करावी
  • ✅  चंदन लागवडीसाठी आपल्याकडील " ईस्ट इंडियन सॅंडलवूड " हा प्रकार सर्वोत्तम आहे
  • ✅  चंदन लागवड केल्यानंतर 12 - 15 वर्षांनी किफायतशीर उत्पन्न मिळते
  • ✅  चंदन लागवडीसाठी वनविभागा कडून बियाणे अथवा रोपांची खरेदी करावी
  • ✅  लागवड 15 ×15 फूट अंतरावर करावी आणि चंदन हे परपोषी असल्यामुळे 3 प्रकारच्या होस्टची लागवड त्याच वेळेस करावी
  • ✅  पॉट होस्ट व कमी कालावधीचा होस्ट म्हणून तुर, लाजाळू लागवड करावी
  • ✅  मध्यम कालावधीच्या होस्टसाठी शेवगा, सुरू, हादगा,पपई,लिंबू ही पिके निवडावीत
  • ✅  दिर्घायुषी होस्टसाठी लिंब, मोहगनी,करंज,सुरू, मिलीया डुबिया इत्यादीची लागवड करावी
  • ✅  चंदन लागवड केलेल्या क्षेत्राची वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी वारा रोधक झाडाची लागवड करावी
  • ✅  लागवड केल्यानंतर सुरुवातीचे 3-4 वर्षे औषधी वनस्पती तसेच कडधान्यवर्गीय अंतर पिके घ्यावीत
  • ✅  चंदनाचे खोड सरळ रेषेत व विना गाठ तयार करण्यासाठी झाडाची वाढ शंकू आकाराची करावी
  • ✅  त्यासाठी छाटणीची शास्त्रोक्त पद्धत माहित करून घ्यावी होस्ट प्लॅन्टची सावली 50% पेक्षा जास्त प्रमाणात चंदनाच्या झाडावर पडणार नाही याप्रमाणे त्यांची छाटणी करावी
  • ✅  चंदनाच्या झाडास नियमितपणे पाणी घ्यावे
  • ✅  ट्रायकोडर्मा, मेटाराईझम,प्यासीलोमायसिस, सुडोमोनासास व बिवेरिया यां किड व रोग नियंत्रणासाठी जैविक तथा वनस्पतीजन्य किडनाशकांची फवारणी घ्यावी
  • ✅  झाडाच्या संरक्षणासाठी एकाच वेळेस वेगवेगळे पर्याय वापरावेत
  • ✅  12- 15 वर्षानी एका चंदन झाडापासून हार्ट वूड ( गाभा )12 - 15 किलो व आणि 35 ते 40 किलो हार्ड वूड ( लाकूड ) मिळते
  • ✅  चंदनाचे 15 वर्षाच्या एक एकर लागवडी मधून 2 - 2,5 कोटी निव्वळ नफा होतो
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter