✅ हलक्या ते मध्यम आणि पडीक जमिनीवर किंवा बांधावर साग लागवड करावी
✅ फळबाग व भाजीपाला पिकासाठी वारा रोधक म्हणून साग लागवड करावी
✅ साग लागवडीसाठी सागाचे स्टंम्प वापरावेत
✅ वनविभागाकडून साग स्टंम्पची खरेदी करावी
वळवाचे 1 - 2 पाऊस झाल्याबरोबर सागाचे स्टंप लावावेत
✅ सागाची सलग लागवड 2 × 2 किंवा 3 × 3 मी
✅ आणी बांधावर 3 - 4 मीटर अंतरावर करावी
✅ जैविक खते व जैविक किडनाशकाची प्रक्रिया करून साग स्टंम्पची लागवड करावी
✅ वर्षातून दोन वेळेस जून - जुलै व ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये रासायनिक खत 100- 200 ग्रॅम व लिंबोळी खत 500 ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे खते द्यावीत
✅ सुरुवातीला सुरुवातीची 2 - 3 वर्षे झाडांना नियमित पाणीपुरवठा करावा
✅ पहिली विरळणी 5 - 7 वर्षांनी करावी व दुसरी विरळणी 10 - 11 वर्षांनी करावी
✅ दरवर्षी 2 वेळेस म्हणजेच पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर खोडास गेरूचा मुलामा 4 - 5 फूट उंचीपर्यंत लावावा
✅ सागाची छाटणी दुसऱ्या आणी तिसऱ्या वर्षी मार्च आणि जून मध्ये करावी
✅ झाडाचे खोड 3 - 4 मिटर उंचीपर्यंत सरळ व गाठरहित राहील याची दक्षता घ्यावी
✅ सागाच्या झाडाची छाटणीचे तंत्र माहित करून घ्यावे अन्यथा सागाची जळावू लाकूड म्हणून विक्री करावी लागते
✅ खोडकिड आणी वाळवीचे नियंत्रण वेळीच करावे
✅ 20- 25 वर्षांनी सागाच्या एका झाडापासून 12 ते 15 घनफूट लाकूड मिळते