शेवंती फुल पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान

  • ✅  शेतीमध्ये काम करण्यासाठी स्वतःची घरची मंडळी असेल तर फुल पिकाची शेती परवडू शकते
  • ✅  जास्त तापमान किंवा जास्त थंडीचा कालावधी सोडून वर्षभर शेवंतीची लागवड करता येते
  • ✅  जून - जुलै अथवा एप्रिल - मे मध्ये लागवड करावी
  • ✅  उत्तम निचऱ्याची हलकी ती मध्यम जमीन शेवंतीचे लागवडीसाठी निवडावी
  • ✅  6-7 फूट रुंद , 1 फूट उंचीचे बेड तयार करावेत
  • ✅  त्यावर 1,25 - 1,5 फूट अंतरावर लागवड करावी
  • ✅  खाजगी उत्पादकाचे विविध रंगाचे वाण लागवडीसाठी उपलब्ध आहेत, बाजारभावाचा अंदाज घेऊन वाणाची निवड करावी
  • ✅  लागवडी पूर्वी ट्रायकोडर्मा, बिव्हेरिया, मेटारायझम, पॅसिलोमायसिस, सुडोमोनस, पीएसबी व केएमबी ची प्रक्रिया करावी
  • ✅  जैविक खताच्या व किडनाशकाच्या आळवण्या पावसाळ्यात आणि हिवाळी हंगामात कराव्यात
  • ✅  एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी 8-10 टन शेणखत व संयुक्त खताच्या 3-4 बॅग बेडमध्ये भराव्यात व त्यानंतर पीक अवस्थेनुसार ठिबक मधून पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर करावा
  • ✅  रस शोषण करणाऱ्या किडी,पाने खाणाऱ्या अळ्या, लाल कोळी तसेच पानावरील ठिपके, रोपांची मर, मुळकुज, भुरी, तांबेरा इत्यादी रोगांचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाचे उपाय योजावेत
  • ✅  नियमितपणे फुलाचा थोडा करावा,शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाच वाजल्यानंतर फुले तोडावीत
  • ✅  एकाच बाजारपेठेवर विसंबून न राहता वेगवेगळ्या बाजारपेठेच्या मागणी आणि पुरवठ्याचा विचार करून विक्रीसाठी फुले पाठवावीत
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter