मोगरावर्गीय फुलपिकाचे लागवड तंत्रज्ञान
✅ मोगरा वर्गीय फुल पिकांमध्ये मोगरा, जाई, जुई, कागडा, चमेली इत्यादी चा समावेश होतो
✅ हलक्या ते मध्यम, डोंगर उताराच्या, वरकस, पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड करावी
✅ छाट कलमाद्वारे तयार केलेल्या रोपांची लागवड करावी
✅ लागवडीपूर्वी रोपास जैविक खते व किडनाशकाची बिजप्रक्रिया करावी
✅ रोपे पाहिजे त्या वाणाची व खात्रीशीर रोपवाटिकेतून विकत घ्यावीत
✅ मोगरा व जाई पिकांची लागवड 6 × 6 किंवा 6 × 3 फूट आणी जुई लागवड 4,5 × 4,5 फूट अंतरावर करावी
✅ लागवडीसाठी 2 × 2 × 2 फूट आकाराचे खड्डे उन्हाळ्यात घेऊन ते चांगले तापू द्यावेत व पावसाळ्यात शेणखत,लिंबोळी पेंड आणी जैविक खते मिसळून भरून घ्यावेत
✅ लागवड केल्यानंतर दर चार महिन्याला 100- 200 ग्रॅम संयुक्त खत झाडास दयावे
✅ दरवर्षी प्रति झाड 10 - 15 किलो शेणखत,120 ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रत्येकी वर्षातून विभागून जून आणि जानेवारीमध्ये द्यावे
✅ सण समारंभासाठी जास्तीची फुले विक्रीला यावीत यासाठी पाण्यात विरघळणारी खते फवारणी द्वारे द्यावीत
✅ फुलांचा योग्य व हवा असलेला हंगाम घेण्यासाठी दर वर्षी झाडाची छाटणी करावी
✅ छाटणी पूर्वी झाडाचे 20 ते 25 दिवस पाणी बंद करावे व झाडास ताण द्यावा
✅ झाडाला योग्य तो आकार देऊन झाड सुटसुटीत व सेंटर ओपन ठेवावा
✅ पावसाळ्यात आवश्यकतेप्रमाणे, हिवाळ्यात 10-12 दिवसांनी व उन्हाळ्यात 5-7 दिवसांनी पाणी द्यावे
✅ मोगरावर्गीय फुल पिकावर कळी पोखरणारी अळी, पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या अळ्या तसेच लाल कोळी, पांढरी माशी, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव होतो
✅ तसेच करपा, मूळकुज, सूत्रकृमी इत्यादींचा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाचे उपाय योजावेत
✅ ट्रायकोडर्मा, मेटाराईझम, पॅसिलोमाइसिस, सुडोमोनोस व बिव्हेरिया या जैविक किडनाशकांच्या पावसाळ्यात, हिवाळ्यात आळवण्या घ्याव्यात
✅ दररोज फुलांची तोडणी करावी आणि सकाळी लवकर तोडणी करून ताजी फुले बाजारात चांगली पॅकिंग करून पाठवावीत