निशिगंध लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

  • ✅  निशिगंध हे बहुवार्षिक, कमी उत्पादन खर्चाचे, लागवडी सोपे व नियमित चांगला बाजारभाव असलेले फुलपिक आहे
  • ✅  निशिगंधाची लागवड हलक्या ते मध्यम, उत्कृष्ट निचऱ्याच्या जमिनीत करावी
  • ✅  हराळी व लव्हाळा यासारख्या बहुवार्षिक तणाचा प्रादुर्भाव असलेल्या जमिनीमध्ये निशिगंधाची लागवड करू नये
  • ✅  लागवडी पूर्वी 10 टन शेणखत 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट व 3 - 4 बॅग संयुक्त खत चांगले मातीत मिसळून घ्यावे व नंतर बेड तयार करावेत
  • ✅  निशिगंधाची लागवड जानेवारी - फेब्रुवारी मे - जून आणि सप्टेंबर - ऑक्टोबर या महिन्यात करता येते
  • ✅  रुंद वरंबा सरी पद्धतीने निशिगंधाची लागवड करावी त्यासाठी 3 - 4 फुट रुंदीचे, अर्धा फुट उंचीचे बेड तयार करावेत
  • ✅  बेडची लांबी जमिनीचे उताराप्रमाणे ठेवावी
  • ✅  निशिगंधाचे सिंगल, डबल व व्हेरिगेटेड प्रकार आहेत
  • ✅  सिंगल प्रकारामध्ये फुले रजनी, डबल प्रकारामध्ये फुले रजत तर व्हेरिगेटेड प्रकारांमध्ये सुवर्ण रेखा, रजत रेखा, सिक्कीम लोकल इत्यादी वाण लागवडीसाठी वापरावेत
  • ✅  लागवडीसाठी सुधारित वाणाचे, योग्य आकाराच्या व दर्जेदार कंदाची निवड करावी
  • ✅  लागवडीपूर्वी जैविक खते व जैविक किडनाशकाची कंदास प्रक्रिया करावी
  • ✅  नियमित व दर्जेदार फुलाचे उत्पादनासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे
  • ✅  पिक वाढीच्या अवस्थेनुसार पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर करावा
  • ✅  जमिनीची प्रत, पिकवाढीची अवस्था व हंगामातील वातावरना नुसार पाणी व्यवस्थापन करावे
  • ✅  या पिकावर रस शोषण करणाऱ्या किडी व पाने खाणाऱ्या अळ्या तसेच पानावरील करपा, मर, कंदकुज, फुलदांडा सड इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी एकात्मिक कीड व रोग नियंत्रण उपस्थित उपाय करावेत
  • ✅  ट्रायकोडर्मा, मेटाराईझम, पॅसिलोमाइसिस, सुडोमोनोस व बिव्हेरिया या जैविक किडनाशकांच्या पावसाळ्यात, हिवाळ्यात आळवण्या घ्याव्यात
  • ✅  फुलाची तोडणी सकाळी लवकर करावी
  • ✅  पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी दांड्यासह फुलाची काढणी करावी
  • ✅  सुट्ट्या फुलांच्या विक्रीसाठी पूर्ण वाढलेल्या कळ्यांची व उमललेल्या फुलांची काढणी करावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter